Rudraksha Benefits: शास्त्रामध्ये रुद्राक्ष अत्यंत प्रिय आणि पवित्र मानले गेले आहेत. असे म्हटले जाते की रुद्राक्षाचा वापर सामान्यतः धार्मिक कार्यांमध्ये केला जातो. रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते अशी धारणा आहे. शास्त्रात एकमुखी पासून पंधरामुखी पर्यंत रुद्राक्ष सांगितले गेले आहेत. ज्यातील एकमुखी रुद्राक्ष आणि गौरीशंकर रुद्राक्ष सर्वात शुभ मानले जाते.
असे मानतात की, एखाद्या व्यक्तीने एकमुखी रुद्राक्षाची माळ घातली तर त्याच्यामध्ये जग जिंकण्याची क्षमता येते. तुम्ही पंचमुखी रुद्राक्षदेखील परिधान करू शकता. हे रुद्राक्ष सहज उपलब्ध होऊ शकतात. panchmukhi rudraksha mala benefits
अधिक वाचा : 'या' 5 आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमची किडनी ठेवतात निरोगी
ज्योतिषशास्त्रानुसार रुद्राक्ष परिधान करण्यापूर्वी गंगेच्या पाण्याने ते शुद्ध करा. यानंतर भगवान शंकराच्या ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. अशाप्रकारे माळ पावन होते. रुद्राक्षाची माळ शुभ मुहूर्तावर धारण करणे लाभदायक मानली जाते.
अधिक वाचा : राम नवमीच्या दिवशी भारतातील दोन मंदिरांमध्ये दुर्घटना