Paryushan Parv 2019: काय असतं पर्युषण पर्व? जाणून घ्या पर्युषण पर्वाचं महत्व

धर्म-कर्म-भविष्य
Updated Aug 26, 2019 | 15:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Paryushan Parv in marathi: जैन धर्मातील बांधव पर्युषण पर्व साजरा करत असतात. जैन धर्मातील काही महत्वपूर्ण धार्मिक उत्सवांमध्ये पर्युषण पर्वाचंही एक वेगळं महत्व आहे. जाणून घ्या याच पर्युषण पर्वाचं महत्व काय आहे.

Paryushan Parv
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • जैन धर्मात पर्युषण पर्वाला मोठं महत्व
  • जैन धर्म आणि पर्युषण पर्व यांना अनेक वर्षांची परंपरा आहे
  • या काळात समाजप्रबोधनाचंही काम केलं जातं

मुंबई: जैन समाजाचा सर्वात पवित्र उत्सव म्हणजेच पर्युषण पर्व आज सोमवार (२६ ऑगस्ट) पासून सुरू झालं आहे. पुढील आठ दिवस जैन धर्मातील श्वेतांबर पंथातील बांधव हे पर्युषण पर्व साजरा करतील. तर, दिगंबर समुदायातील जैन बांधव १० दिवसांपर्यंत या पवित्र व्रताचं पालन करतील. पर्युषण पर्व सुरू होण्यापूर्वीच जैन बांधवांनी सर्व मंदिर, धार्मिक स्थळांची साफसफाई पूर्ण केली आहे. पर्युषण पर्वाला जैन समाजातील सर्वात मोठं पर्व मानलं जातं आणि त्यामुळे याला पार्वधिराज असंही म्हटलं जातं.
पर्युषण पर्वामध्ये जैन धर्माच्या पाच सिद्धांतांचं पालन केलं जातं. या पाच सिद्धांतांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह (गरजेपेक्षा अधिक धन जमा न करणे) यांचा समावेश आहे.

पर्युषण पर्व म्हणजे काय?

पर्युषणचा सामान्य अर्थ आहे की, मनातील सर्व विकार कमी करणे. म्हणजेच या उत्सवात आपल्या मनात उद्भवणारे सर्व वाईट विचार दूर करण्याचा उपवास म्हणजे पर्युषण पर्व होय. जैन धार्मिक नेते, बांधव या पर्युषण पर्वाच्या काळात मनातील सर्व विकार-क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि वैराग्यापासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. या सर्व विकारांवर विजय मिळवल्यानंतर त्यांना स्वत:ला शांती आणि शुद्धतेकडे नेण्याचा मार्ग सापडतो. जैन धर्मानुसार, भाद्रपद महिन्याच्या पंचमी तिथीला सुरू होणारं पर्युषण पर्व अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू राहणार आहे. हा उत्सव साजरा करणारे अनुयायी भगवान महावीरांनी सांगितलेल्या १० नियमांचं पालन करुन पर्युषण पर्व साजरा करतात.

विविध व्रतांचं पालन

जैन धर्मातील दिगंबर पंथामधील अनुयायी पर्युषण पर्वच्या काळात १० दिवस विविध व्रतांचं पालन करतात. यासाठी या पर्युषण पर्वाला दशलक्षणा पर्व असंही म्हणतात. त्याचवेळी श्वेतांबर पंथामधील लोक आठ दिवस हा उत्सव साजरा करतात म्हणून या पंथातील अनुयायी अष्टिक म्हणून पर्युषण साजरा करतात.

जैन धर्माच्या मुख्य तत्वावर चालण्याचा मार्ग

हिंदू धर्मातील नवरात्रांप्रमाणेच मानला जाणारा हा उत्सव जैन धर्माचं मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दर्शवतो. या उत्सवाच्या काळात जैन धर्मिय नागरीक संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात आणि आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करतात. पावसाळ्यात साजरा होणारं हे पर्युषण पर्व समाजाला निसर्गासोबत जोडण्याचं प्रशिक्षण देतो. या उत्सवात जैन समाजातील बांधव संपूर्ण भक्तीभावाने धार्मिक उपवास करतात.

पर्युषण पर्व (Paryushan Parv) पावसाळ्यात असतो. पावसाळ्यातील चार महिन्यात पृथ्वीतलावर सर्वत्र हिरवळ वाढते. या काळात बऱ्याच प्रकारचे प्राणी, सूक्ष्मजीव जन्माला येतात. वाटेत चिखल किंवा पाणी साचल्यामुळे मार्गावर चालता येत नाही. हे सर्व लक्षात घेऊन जैन साध्वींनी या काळात एकाच ठिकाणी राहून देवाची उपासना करण्याची व्यवस्था केली. या काळात प्रवचन, धर्मसाधना, प्रार्थना केल्या जातात.

पर्युषण पर्वाच्या काळात अनुयायी करता ही प्रमुख कामे

  1. पर्युषण पर्वाच्या काळात सर्व भाविक धार्मिक ग्रंथांचं वाचन करतात. 
  2. धार्मिक प्रवचन ऐकले जातात.
  3. पर्युषण पर्वाच्या काळात भाविक उपवासही करतात. पुण्य लाभावे यासाठी दान देणं हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
  4. जैन मंदिरांची विशेषत: साफ सफाई करुन स्वच्छता केली जाते, सजावट केली जाते.
  5. पर्युषण पर्वाच्या काळात रथयात्रा किंवा मिरणवणुका काढल्या जातात.
  6. या काळात मंदिर किंवा सार्वजनिक ठिकाणी सामुदायिक भोजनाची व्यवस्था केली जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...