Shani Dev : साडे सात वर्षानंतर धनु राशीतून मुक्त होणार शनी, या दोन राशींनाही मिळणार दिलासा

शनी राशीचे लवकरच परिवर्तन होणार आहे. एप्रिल महिन्यात शनी राशी बदलत असून वर्तमानात शनी मकर राशीत गोचर करत आहेत. शनी आता मकर राशीतून निघून कुंभ राशीत येणार आहे. शनी राशीचे कधी परिवर्तन करणार आहे जाणून घेऊया सविस्तर.

shani
शनी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शनी राशीचे लवकरच परिवर्तन होणार आहे.
  • एप्रिल महिन्यात शनी राशी बदलत असून वर्तमानात शनी मकर राशीत गोचर करत आहेत.
  • शनी आता मकर राशीतून निघून कुंभ राशीत येणार आहे.

Shani Dev : शनी राशीचे लवकरच परिवर्तन होणार आहे. एप्रिल महिन्यास शनी राशी बदलत असून वर्तमानात शनी मकर राशीत गोचर करत आहेत. शनी आता मकर राशीतून निघून कुंभ राशीत येणार आहे. शनी राशीचे कधी परिवर्तन करणार आहे जाणून घेऊया सविस्तर.


शनी राशी परिवर्तन २०२२ 

पंचागानुसार शनी २० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी कुंभ राशीमध्ये गोचर करणार आहे. जवळपास अडीच वर्षानंतर शनी मकर राशीत गोचर करणार आहे. शनी ग्रहाचे हे परिवर्तन सर्व राशींना प्रभावित करणार आहे. परंतु तीन राशींवर याचा जास्त प्रभाव पडणार आहे. 


साडेसाती पासून मुक्ती

शनीचे हे राशी परिवर्तनाचा फायदा धनु राशींना होणार आहे. शनी ग्रहाचा कुंभ राशी प्रवेश होणार असल्यामुळे धनु राशीतील व्यक्तींच्या आयुष्यातून साडेसाती निघून जाणार आहे. विशेष म्हणजे साडे सात वर्षानंतर धनु राशीतून साडेसाती दूर होणार आहे. मोठ्या काळानांतर धनु राशीच्या लोकांना दिलासा मिळणार आहे,. शनी राशीच्या परिवर्तनामुळे धनु राशीच्या लोकांना धन, आरोग्य, नोकरी, शिक्षणसंबंधित सर्व अडथळे दूर होणार आहेत. 


मिथून आणि तुळ राशींना मिळणार दिलासा

ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीतून शनी गोचर झाल्याने मिथून आणि तुळ राशी असलेल्या व्यक्तींची शनीपासून मुक्तता मिळणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून आयुष्यात ज्या ज्या समस्या येत आहेत त्या दूर होणार आहेत. धन लाभ होणार आहे आणि उत्पन्नही वाढणार आहे. तसेच व्यापारात यश मिळणार असून नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी