Numerology: पैशांच्या बाबतीत खूप लकी असतात या जन्मतारखेच्या व्यक्ती, नशिबाची मिळते साथ

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jan 19, 2022 | 12:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Moolank 9 people: अंकज्योतिष शास्त्रात प्रत्येक अंकाला विशेष महत्त्व असते. अंक ज्योतिषानुार प्रत्येक महिन्यातील ९,१८, २ या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक ९ असतो.

numerology
पैशांच्या बाबतीत खूप लकी असतात या जन्मतारखेच्या व्यक्ती 
थोडं पण कामाचं
  • आव्हानांना निर्भीडपणे सामोरे जातात.
  • यांचा स्वभाव निडर असतो.
  • नशीबाची यांना साथ मिळते. 

मुंबई: अंक ज्योतिषशास्त्रात(Numerology) व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याच्या भविष्याचे आकलन केले जाते. यासाठीच अंक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक अंकाला खास महत्त्व आहे. काही विशिष्ट तारखेला जन्माला आलेले लोक बुद्धिमान असतात तर काही तारखेला जन्माला आलेले लोक नशीबवान असतात. यांना नशिबाची साथ मिळते. काहींचा स्वभाव शांत असतो तर काही मनमिळावू असतात. जाणून घ्या ९ मूलांक(moolank 9 people) असलेल्या व्यक्तींचे व्यक्तीमत्व कसे असते. people who born on this day are lucky in money related things

नशीबवान असतात ९ मूलांक असलेल्या व्यक्ती 

अंकज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ९,१८ आणि २७ तारखेला होतो त्यांचा मूलांक ९ मानला जातो. या मूलांकाच्या व्यक्ती प्रॉपर्टीच्या बाबतीत खूप नशीबवान असतात. तसेच या व्यक्ती भरपूर उत्साह आणि उर्जावान असतात. याशिवाय त्यांच्यात साहस आणि निडरता हे गुणही असतात. मूलांक ९ असलेल्या व्यक्ती एखादी गोष्ट करण्याची ठरवल्यास ते करूनच राहतात. 

मंगळ ग्रहाची मिळते साथ

अंक ज्योतिषानुसार मूलांक ९ असलेल्या व्यक्तींचा स्वामी मंगळ असतो. या कारणामुळे या मूलांकाच्या व्यक्ती खूपच व्यवहारिक असतात. दरम्यान, या मूलांकाच्या व्यक्तींना सुरूवातीच्या जीवनात खूप संघर्ष करावा लागतो. मात्र वेळेनुसार यांची स्थिती सुधारते. या मूलांकाच्या व्यक्ती नियमांमध्ये राहून प्रत्येक कामे करतात. जीवनात येणाऱ्या आव्हानांना घाबरत नाहीत तर निडरपणे त्यांचा सामना करतात. ज्यांचा मूलांक ९ असतो, ते खर्‍या अर्थाने श्रीमंत असतात. हे लोक आपल्या कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारांवार खूप पैसे खर्च करतात. याची राहणी उच्च असते. असे असले तरी ९ मुलांक असलेले व्यक्ती थोडे रागीट स्वभावाचे असतात. 

(डिस्क्लेमर : येथे प्रदान केलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. timesnowmarathi.com कोणत्याही प्रकारच्या प्रमाणीकरणास, माहितीला मान्यता देत नाही. कोणतीही माहिती किंवा गृहितक लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या​.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी