Numerology Number 8 Horoscope 2022 : या दिवशी जन्माला आलेल्यांचे भाग्य असते जोमात, शनीदेवाची असते कृपा

Numerology Number 8 Horoscope 2022 अंक ज्योतिषमध्ये ८ क्रमांकाला शनी हा स्वामी ग्रह म्हटले आहे. ज्यांच्या जन्म महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला  होतो त्यांचा मूलांक किंवा भाग्यांक ८ असतो. या लोकांचा स्वभाव थोडासा गूढ असतो. यांच्या मनात काय चाललं असतं हे भल्या भल्या माणसांच्या लक्षात येत नाही.

थोडं पण कामाचं
  • अंक ज्योतिषमध्ये ८ क्रमांकाला शनी हा स्वामी ग्रह म्हटले आहे.
  • या लोकांचा स्वभाव थोडासा गूढ असतो.
  • यांच्या मनात काय चाललं असतं हे भल्या भल्या माणसांच्या लक्षात येत नाही.

Numerology Number 8 Horoscope 2022 : अंक ज्योतिषीनुसार आपल्या आयुष्यात अंकांना फार महत्त्व आहे. काही अंक आपल्यासाठी लकी असतात तर काही अंक आपल्यासाठी अनलकी ठरता. अंकशास्त्रात क्रंमांक १ ते ९ अंकाचे वर्णन केले आहे. तसेच या ९ क्रमांकांवर वेगवेगळ्या ग्रहांचे अधिपत्य आहे असे अंकशास्त्रात म्हटले आहे. (Numerology Number 8 Horoscope 2022)

शनी हा स्वामी ग्रह

अंक ज्योतिषमध्ये ८ क्रमांकाला शनी हा स्वामी ग्रह म्हटले आहे. ज्यांच्या जन्म महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला  होतो त्यांचा मूलांक किंवा भाग्यांक ८ असतो. या लोकांचा स्वभाव थोडासा गूढ असतो. यांच्या मनात काय चाललं असतं हे भल्या भल्या माणसांच्या लक्षात येत नाही. ज्यांचा मूलांक ८ आहे त्यांचा शनीदेव हा स्वामी आहे. या तारखेला जन्मलेल्या लोकांवर शनीदेव प्रसन्न असतो आणि त्यांना आयुष्यात खूप लाभ होतात. 


शनी देवाची विशेष कृपा

अंक ज्योतिषानुसार ज्यांचा भाग्यांक किंवा मुलांक ८ असतो त्यांच्यावर शनी देवाची विशेष कृपा असते. भाग्यांक ८ असलेले लोक अतिशय इमानदार आणि कठोर असतात. दुसर्‍या लोकांची ते मदत करतात आणि साथ देतात. काम पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत, म्हणून त्यांना प्रत्येक कार्यात यश मिळते. आयुष्यात खूप यश मिळाल्यानंतरही हे लोक सामान्य जीवन व्यतित करतात. या लोकांचा स्वभाव गंभीर आणि शांत असतो. कुठलेही काम संपूर्ण निष्ठेने पार पाडतात.


लोखंड आणि तेलाशी संबंध

ज्यांचा भाग्यांक ८ आहे ते बहुतांश लोक अभियांत्रिकी म्हणजेच इंजीनीरिंग किवा इलेक्ट्रॉनिकशी संबंधित असतात. या लोकांच्या नशीबात व्यापारात यश असते. या लोकांना बांधकामाशी संबंधित वस्तू, लोखंड आणि तेलाशी संबंधित व्यवसायात मोठे यश आहे. भाग्यांक ८ असलेले लोक पोलीस किंवा सैन्यासारख्या क्षेत्रातही यशस्वीरित्या काम करतात. 

उशीरा लग्न

ज्यांचा भाग्यांक ८ असतो त्यांचे प्रेमसंबंध स्थिर नसतात. एका व्यक्तीवर प्रेम असेल तर त्याची कबुली देत नाहीत, त्यामुळे त्यांच्या विवाहाला विलंब होतो. तसेच आपल्या साथीदाराशी सातत्याने मतभेद होतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी