Pithori Amavasya 2022: कधी आहे पिठोरी अमावस्या? या दिवशी पिठाच्या मुर्त्या बनवून महिला का करतात पुजा? जाणून घ्या सविस्तर 

हिंदू पंचागानुसार प्रत्येक महिन्याला एक अमावस्या तिथी असते. ही अमावस्या तिथी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तसेच या तिथीचे धार्मिक विशेष महत्त्वही असते. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा पिठोरी अमावस्या शनिवारी २७ ऑगस्ट २०२२ रोजी असणार आहे. काही ठिकाणी पिठोरी अमावस्येला कुशोत्पतिनी अमावस्या किंवा पोला पिठोराही म्हणतात.

pithori amavasya
पिठोरी अमावस्येचे महत्व  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदू पंचागानुसार प्रत्येक महिन्याला एक अमावस्या तिथी असते.
  • भाद्रपद महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात.
  • यंदा पिठोरी अमावस्या शनिवारी २७ ऑगस्ट २०२२ रोजी असणार आहे.

Pithori Amavasya 2022 Vrat Puja Importance: हिंदू पंचागानुसार प्रत्येक महिन्याला एक अमावस्या तिथी असते. ही अमावस्या तिथी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तसेच या तिथीचे धार्मिक विशेष महत्त्वही असते. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. यंदा पिठोरी अमावस्या शनिवारी २७ ऑगस्ट २०२२ रोजी असणार आहे. काही ठिकाणी पिठोरी अमावस्येला कुशोत्पतिनी अमावस्या किंवा पोला पिठोराही म्हणतात. पिठोरी अमावस्येला दुर्गा मातेची पुजा केली जाते. या दिवशी महिला पिठाची मुर्ती बनवून अपत्यप्राप्तीसाठी तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पुजा करता. जाणून घ्या पिठोरी अमावस्येचा मुहुर्त आणि पुजेची विधी. (Pithori Amavasya 2022 know date muhurt and importance in hindu religion)

अधिक वाचा : शत्रूपेक्षाही धोकादायक असतात 'ही' लोक, यांच्यापासून नेहमी रहा चार पावलं दूर


२७ ऑगस्टला आहे पिठोरी अमावस्या

या वर्षी शनिवारी, २७ ऑगस्ट २०२२ रोजी पिठोरी अमावस्या साजरी होणार आहे. धार्मिक कथानुसार माता पार्वतीने इंद्राची पत्नी इंद्राणीला या व्रताबद्दल सांगितले होते. हे व्रत केल्यास अपत्य प्राप्त होते तसेच ज्या महिला हे व्रत करतात त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य लाभते.

अधिक वाचा : Pitru Paksha २०२२:या तारखेपासून सुरू होणार आहे पितृपक्ष, तिथीनुसार करा पूर्वजांचे पिंडदान

पिठाच्या मुर्तीची पुजा

पिठोरी अमावस्येच्या दिवशी महिला पीठ मळून ६४ मुर्त्या बनवतात. या ६४ मुर्त्या माता दुर्गासहित ६४ देवींना समर्पण केल्या जातात. या दिवशी महिला या मुर्त्यांची पुजा करून अपत्यप्राप्ती आणि आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना करतात. पिठोरी अमावस्येचे व्रत फक्त सुवासिनी महिलाच करतात. अवाहिवात तरुणी किंवा महिला हा व्रत करत नाहीत.  

अधिक वाचा :Vastu Tips : घरामध्ये सौभाग्य हवं असेल तर नक्की करा हे 5 उपाय, मग पहा माता लक्ष्मीचा चमत्कार

पिठोरी अमावस्येचे महत्व

पिठोरी अमावस्येला पवित्र नदीत आंघोळ करणे आणि गरीबांना दान करणे महत्त्वाचे अस्ते. या दिवशी नदीत आंघोळ केल्यानंतर पितरांसाठी दान केल्यास पितृदोषातून मुक्ती मिळतेल. पित्र प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण केले जाते तसेच देवीची पुजाही केली जाते. 

अधिक वाचा :Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी करा हे छोटे काम, लक्ष्मी मातेच्या कृपेने व्हाल मालामाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी