Pitru Paksha २०२२:या तारखेपासून सुरू होणार आहे पितृपक्ष, तिथीनुसार करा पूर्वजांचे पिंडदान

हिंदू धर्मात पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असते. पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून पिंडदान केले जाते. पितृपक्षात पिंडदान किंवा दान केले पाहिजे त्यामुळे पित्र प्रसन्न होतात आणि आशिर्वाद देतात. पितृ पक्ष भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला सुरू होतो. तर अश्विन महिन्याच्या अमावस्येला समाप्त होतो.

pinddan
पिंडदान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • हिंदू धर्मात पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असते.
 • पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून पिंडदान केले जाते.
 • पितृपक्षात पिंडदान किंवा दान केले पाहिजे त्यामुळे पित्र प्रसन्न होतात आणि आशिर्वाद देतात.

Pitru Paksha Pind Daan २०२२: हिंदू धर्मात पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असते. पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून पिंडदान केले जाते. पितृपक्षात पिंडदान किंवा दान केले पाहिजे त्यामुळे पित्र प्रसन्न होतात आणि आशिर्वाद देतात. पितृ पक्ष भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला सुरू होतो. तर अश्विन महिन्याच्या अमावस्येला समाप्त होतो. या वर्षी पितृ पक्ष  १० सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. तर २५ सप्टेंबरला समाप्त होणार आहे.  (pitru paksh 2022 dates shraddh pind dan process of ancestors)

अधिक वाचा : Surya-Shukra Yuti: सूर्य-शुक्र संयोगाचा या राशींना फायदा, धनलाभ होईल

बर्‍याच वेळेला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आपल्याला माहित नसते. अशावेळी पिंडदान करावे की श्राद्ध घालावे अशा विवंचनेत कुटुंबीय असतात. ज्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आपल्याला माहित नसते त्यांच्यासाथी अमावस्येला पिंडदान केले जाते. पितृपक्षाच्या वेळी दान धर्म केले जाते. परंतु या काळात लग्न, मुंज तसेच गृहप्रवेशासरीख शुभ कार्य केली जात नाही. जाणून घेऊया श्राध्दाच्या तारखा.

Ratna Jyotish: रत्न परिधान करताना या चुका करु नका अन्यथा होईल उलट परिणाम

पितृपक्षाच्या तिथी, या दिवशी करा पिंडदान

 1. १० सप्टेंबर २०२२ : पौर्णिमा भाद्रपद
 2. ११ सप्टेंबर २०२२ : कृष्ण पक्ष प्रतिपदा आश्विन मास
 3. १२ सप्टेंबर २०२२ : कृष्ण पक्ष द्वितीय, आश्विन मास
 4. १३ सप्टेंबर २०२२ : तृतीय कृष्ण पक्ष आश्विन मास
 5. १४ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी
 6. १५ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी
 7. १६ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी
 8. १७ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी
 9. १८ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी
 10. १९ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी
 11. २० सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी
 12. २१ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकदाशी तिथी
 13. २२ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी
 14. २३ सप्टेंबर २०२२ : आश्विन मास, त्रयोदशी, कृष्ण पक्ष
 15. २४ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी
 16. २५ सप्टेंबर २०२२ : आश्विन महिन्यातील अमावस्या आणि पितृपक्ष का समापन

अधिक वाचा :  घराच्या मेन गेटवर गणपतीची प्रतिमा असल्याने पडतो हा वाईट परिणाम

पितृपक्षातील पिंडदानाचे महत्त्व

पूर्वजांच्या शांतीसाठी पितृपक्ष फार महत्त्वाचे आहे. या काळात श्राध्द घातल्यास पूर्वज प्रसन्न होतात आणि आशिर्वाद देतात. धार्मिक मान्यतानुसार पितृपक्षात केलेले अन्नदान थेट पूर्वजापर्यंत पोहोचतं. पितृदोष निवारणासाठी पितृपक्षाचा काळ फार महत्त्वाचा मानला जातो.

अधिक वाचा :  Astrology: चुकूनही या गोष्टी हातात देऊ नका...नाहीतर होईल नुकसान

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी