Grah Gochar:या ३ राशीच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल, ऑगस्टमध्ये हे ग्रह करणार गोचर

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 11, 2022 | 13:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Planet Transit 2022:ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रांचे राशी परिवर्तन सर्व व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव टाकतात. अशातच ऑगस्टमध्ये तीन ग्रह गोचर करणार आहेत.

planets
Grah Gochar: या ३ राशीच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल 
थोडं पण कामाचं
  • ऑगस्टमध्ये पहिले गोचर ९ तारखेला होईल.
  • दुसरे गोचर ११ ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दिवशी होईल.
  • ऑगस्टमधील तिसरे आणि शेवटचे गोचर १७ ऑगस्टला सूर्य राशीत परिवर्तन होणार आहे.

मुंबई: प्रत्येक महिन्यात काही ग्रह स्थान परिवर्तन(Planet transist) करतात आणि त्याचा प्रभाव सर्व १२ राशींच्या(zodiac sign) व्यक्तींवर पाहायला मिळतो. जुलैमध्ये येथे ५ ग्रहांनी गोचर केले आहे. याचा प्रभाव ३ राशीच्या लोकांच्या जीवनावर पाहायला मिळणार आहे. ऑगस्टमध्ये(august) पहिले गोचर ९ तारखेला होईल. या दिवशी बुध ग्रह सिंह राशीत(leo sign) प्रवेश करणार आहे. तर दुसरे गोचर ११ ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दिवशी होईल. या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यासोबतच ऑगस्टमधील तिसरे आणि शेवटचे गोचर १७ ऑगस्टला सूर्य राशीत परिवर्तन होणार आहे. यासोबतच या दिवशी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. जाणून घ्या या दरम्यान कोणत्या राशींच्या जीवनावर प्रभाव पाहायला मिळेल. planet transition will affect on this 3 zodiac sign in august month

अधिक वाचा - India vs England:टी-२० सामना हरताच या प्लेयरवर भडकले चाहते

मिथुन रास - ऑगस्टमध्ये होणाऱ्या गोचरचा प्रभाव मिथुन राशीच्या जीवनावर पाहायला मिळेल. या राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. या दरम्यान व्यवसायिक लोकांना क्लायंटकडून कौतुक मिळेल. तर ऑगस्टमध्ये होणारे बुध, शुक्र आणि सूर्य ग्रह गोचरने या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल. कामाच्या ठिकाणी अनेक हितशत्रू त्रास देऊ शकतात. इतकंच नव्हे तर समाजात प्रतिष्ठा वाढेल. तसेच कुटुंबातील व्यक्तींसोबत चांगला ताळमेळ राहील. 

तूळ रास - ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी ग्रहाचे गोर हे प्रगती करणारे ठरणार आहे. राशीच्या व्यापाऱ्यांना या गोचरदरम्यान चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. रचनात्मक विचारांमध्ये वृद्धी होईल. या राशीचे जो लोक सरकारी नोकरी करत आहेत त्यांची उच्च अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. 

अधिक वाचा - 'या' सोप्या प्रोसेसनं Aadhaar Card शी लिंक करा मोबाईल नंबर

सिंह रास - सिंह राशीच्या व्यक्तींना ऑगस्टमध्ये होणाऱ्या तीन ग्रहांच्या गोचरमुळे लाभ होणार आहे. या दरम्यान त्यांचा जोश वाढेल. सर्व कामे आत्मविश्वासपूर्वक पूर्ण करतील इतकंच नव्हे तर व्यापाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. या दरम्यान सिंह राशीच्या व्यक्तींचे सौभाग्य उजळेल. हे गोचर आत्मसंतुष्ट करेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी