Numerology Number 6 Horoscope 2022: ६ जन्मांक असणारे घेतील नवीन प्रॉपर्टी, मात्र सांभाळून उचला पावले

Numerology Number 6: ६ अंकाचा स्वामी शुक्र असतो. शुक्र हा फिल्म किंवा मीडियाला लाभकारक ग्रह आहे. बुध आणि शनी हे त्याचे मित्र ग्रह आहेत. ओपल किंवा हिरा हे शुक्राचे रत्न आहे. या जन्मांकाच्या व्यक्ती फिल्म, मीडिया, व्यवस्थापन, कायदा, प्रशासन या क्षेत्रात खूप यशस्वी होतात. शुक्र हा प्रेमासाठी लाभदायक ग्रह आहे.

Numerology Number 6 Horoscope 2022
६ जन्मांकासाठी २०२२चे भविष्य 
थोडं पण कामाचं
  • ज्यांचा जन्म ६, १५ किंवा २४ तारखेला झाला आहे त्यांचा जन्मांक ६
  • या जन्मांकाच्या व्यक्ती फिल्म, मीडिया, व्यवस्थापन, कायदा, प्रशासन या क्षेत्रात खूप यशस्वी
  • यावर्षी शेअर किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक होईल

Numerology Number 6 Horoscope 2022: (अंक ज्योतिष राशिफळ २०२२): ज्यांचा जन्म कोणत्याही वर्षात आणि कोणत्याही महिन्यात ६, १५ किंवा २४ तारखेला झाला आहे त्यांचा जन्मांक ६ आहे. ६ अंकाचा स्वामी शुक्र असतो. शुक्र हा फिल्म किंवा मीडियाला लाभकारक ग्रह आहे. बुध आणि शनी हे त्याचे मित्र ग्रह आहेत. ओपल किंवा हिरा हे शुक्राचे रत्न आहे. या जन्मांकाच्या व्यक्ती फिल्म, मीडिया, व्यवस्थापन, कायदा, प्रशासन या क्षेत्रात खूप यशस्वी होतात. शुक्र हा प्रेमासाठी लाभदायक ग्रह आहे. प्रेमाचा प्रभाव असल्यामुळे ६ या जन्मांकाच्या व्यक्तीचा भाग्योद्य विवाहानंतरच होतो. (Horoscope 2022: Possibility of buying property, but people with number 6 have take precaution)

जन्मांक ६ चे वार्षिक अंकफळ-

१. आरोग्य-

यावर्षी आरोग्य चांगले राहील. लघवीशीसंबंधीत काही त्रास शुक्रामुळे होऊ शकतो. १५ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यानचा काळ थोडा खराब आहे. रक्तदाब, मुधमेह इत्यादी आजार असलेल्यांनी सप्टेंबरनंतर काळजी घ्यावी.

२. नोकरी आणि व्यवसाय-

हे वर्ष तुमच्या करियरसाठी जबरदस्त ठरेल. १५ जानेवारी ते १५ एप्रिल दरम्यान मोठे यश मिळेल. सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि मे ते ऑगस्ट दरम्यान परदेशात जाण्याची संधी मिळेल. जून ते सप्टेंबर या कालावधीत पदोन्नती किंवा नोकरी बदलून प्रगतीची संधी मिळेल.

३. प्रेम जीवन आणि संसारी आयुष्य-

यावर्षी तुमचे प्रेम जीवन चांगले जाईल. एप्रिलनंतर विवाहाची संधी मिळेल १५ मार्चपर्यत प्रेम जीवन सांभाळून वागावे लागेल. यावर्षी तुमच्या संसारी आयुष्यासाठी सुखकारक परिस्थिती असेल. १५ फेब्रुवारी ते १५ मार्च आणि नंतर नोव्हेंबर महिन्यात थोडासा तणाव येऊ शकतो.

४. आर्थिक स्थिती-

१५ मार्चनंतर आर्थिक स्थिती चांगली राहील. यावर्षी शेअर किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक होईल. १५ जुलैनंतर आर्थिक लाभ होईल, पैशांची आवक होईल. जमीन किंवा प्रॉपर्टी विकत घेण्याची संधी मिळेल. वाहन खरेदी करण्याचीही संधी मिळेल. अर्थप्राप्तीची चांगली संधी मिळेल.

५. शुभ समय-

१५ मार्च ते १५ जुलै आणि सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर तसेच डिसेंबर महिना, हा कालावधी तुमच्यासाठी शुभ आहे.

६. समस्यांवरील उपाय-

प्रत्येक शुक्रवारी श्री सुक्ताचे पठन करावे. सुगंधित अत्तरांचा वापर करावा. लक्ष्मीची उपासना करावी. शुक्र आणि बुध यांच्या बीज मंत्राचा जाप करावा. श्री विष्णुसहस्त्रनामाचे पठन करावे.

अंक ज्योतिषामध्ये(numerology) अकांच्या आधारावर भविष्यवाणी केली जाते. यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेवरून भविष्य जाणून घेतले जाते. अंक ज्योतिषानुसार(numerology) प्रत्येक अंक कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो आणि या कारणामुळे प्रत्येकाचे महत्त्व असते. अंक ज्योतिषाच्या माध्यमातून नवीन वर्ष कसे जाणार आहे हे जाणून घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी