Money tips: आर्थिक चणचणीने त्रस्त आहात तर पैशांच्या ठिकाणी ठेवा हे फूल, नाही येणार कमतरता

धर्म-कर्म-भविष्य
Updated Aug 01, 2022 | 14:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

Money Remedies:घरात जर पैशांची तंगी असेल तर ती व्यक्ती नेहमी तणावात राहते. पैशांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गोकर्णाच्या फुलांशी संबंधित तुम्ही उपाय करू शकता. यामुळे घरात आर्थिक समस्या जाणवणार नाहीत. 

money
आर्थिक चणचणीने त्रस्त आहात तर पैशांच्या ठिकाणी ठेवा हे फूल 
थोडं पण कामाचं
  • गोकर्णाच्या फुलांनी होईल आर्थिक चणचण दूर
  • पैशासंबंधित समस्या दूर करण्यासाठी गोकर्णची फुले फायदेशीर
  • गोकर्णाच्या फुलांच्या उपायांन नोकरी-व्यापारात होतो फायदा

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला वाटते की तिच्या घरात नेहमी धनसंपत्ती(money) भरलेली असावी. तसेच लक्ष्मी मातेचा(laxmi mata) आशीर्वाद कायम राहावा. यासाठी खूप मेहनतही करतात. मात्र खूप पैसे कमावणे आणि मेहनत करूनही अनेकांकडे आर्थिक समस्या जाणवत असते. तर याचे कारण ग्रह दोष अथवा वास्तुदोष असू शकतो.

खरंतर अनेक समस्यांचे समाधान आपल्या घरातच असते मात्र अनेकदा त्याकडे आपले लक्ष जात नाही. साधारणपणे सगळ्यांच्याच घरात झाडे-झुडुपे तसेच फुलांची झाडे असतात. याने अनेक समस्या दूर होतात. झाडे ही घराचा वास्तुदोष(vastudosh) दूर करण्यास फायदेशीर ठरतात. तर फुले केवळ बागेची शोभाच वाढवत नाहीत तर याच्या अचूक उपायांनी आर्थिक चणचणही दूर होते. आम्ही बोलत आहोत गोकर्णाच्या फुलांबद्दल...put this  flowers on your money place

अधिक वाचा - राजकारण सोडावंस वाटतंय - रोहित पवार

अनेक घरांमध्ये गोकर्णची वेल असते. ही फुले दिसण्यास अतिशय सुंदर असतात. गोकर्णाच्या फुलांचे अचूक उपाय केल्याने तुमच्या जीवनात धन आणि आनंदाचा वर्षाव होते. जाणून घ्या या उपायांबद्दल...

सोमवारच्या दिवशी ५ गोकर्णची फुले एखाद्या वाहत्या नदीच्या प्रवाहात सोडा. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. 

नोकरी-व्यापारात सतत नुकसान होत असेल तर कामाच्या ठिकाणी गोकर्णच्या फुलांची मुळे एखाद्या निळ्या रंगाच्या कपड्यामध्ये टांगून ठेवा. यामुळे कामाच्या ठिकाणी यश मिळेल. तसेच नोकरीत खूप प्रगती होईल. 

मंगळवारच्या दिवशी हनुमानाच्या चरणी गोकर्णची फुले अर्पण करा आणि नंतर ही फुले आपली पर्स अथवा पैशांच्या ठिकाणी ठेवा.

सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर गोकर्णच फुले चढवल्याने धनलाभ होतो. 

अधिक वाचा - काहीजणांसाठी मूगडाळ खाणं ठरू शकतं धोकादायक

गोकर्णच्या फुलांशी संबंधित उपाय केल्याने तुमच्या जीवनात जरूर बदल होतील. सोबतच या उपायांनी आर्थिक तंगीही दूर होईल. तसेच घरात सदैव लक्ष्मीचा वास राहतो. धन प्राप्तीसाठी गोकर्णच्या फुलांचे हे उपाय अतिशय फायदेशीर ठरतात. 

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी