Raksha Bandhan:उद्याचा रक्षाबंधन खूप स्पेशल, 2200 वर्षांनंतर आलाय 'असा' भन्नाट, खरेदीसाठी ही शुभ दिवस

Raksha Bandhan 2022: काही ठिकाणी पंचांगाच्या फरकामुळे 8 वाजेपर्यंत पौर्णिमा मानली जाणार असल्याने शुक्रवारी पौर्णिमा जास्तीत जास्त 2 तास राहील.

Raksha Bandhan 2022
रक्षाबंधन २०२२ 
थोडं पण कामाचं
  • यंदा रक्षाबंधनाची (Raksha bandhan) नेमकी तारीख 11 ते 12 ऑगस्ट दरम्यान असण्याबाबत सध्या साशंकता व्यक्त होत आहे.
  • यामुळेच यावेळी 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी करणं चांगलं ठरेल.
  • 12 ऑगस्टला पौर्णिमा संध्याकाळी 7.06 पर्यंत असणार आहे.

नवी दिल्ली: Rakshabandhan Muhurta: यंदा रक्षाबंधनाची (Raksha bandhan) नेमकी तारीख 11 ते 12 ऑगस्ट दरम्यान असण्याबाबत सध्या साशंकता व्यक्त होत आहे. यावेळी रक्षाबंधनाची तारीख आणि नक्षत्र याबाबत संभ्रम आहे, कारण श्रावणी पौर्णिमा 11 आणि 12 ऑगस्ट या दोन दिवशी आहे. यावर देशभरातील ज्योतिषी सांगतात की, भद्रा संपल्यानंतर गुरुवारीच पौर्णिमा (Purnima)  आणि श्रावण नक्षत्राचा (Shravan Nakshatra) योग तयार होत आहे. त्यामुळे 11 ऑगस्टच्या रात्री राखी बांधावी. 12 ऑगस्टला पौर्णिमा संध्याकाळी 7.06 पर्यंत असणार आहे.  काही ठिकाणी पंचांगाच्या फरकामुळे 8 वाजेपर्यंत पौर्णिमा मानली जाणार असल्याने शुक्रवारी पौर्णिमा जास्तीत जास्त 2 तास राहील. 

यामुळेच यावेळी 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी करणं चांगलं ठरेल. राखी बांधण्यासाठी 11 ऑगस्ट रोजी 1 तास 20 मिनिटांचा मुहूर्त असेल, जो रात्री 8.25 ते 9.25 पर्यंत असेल. या सणाच्या दिवशी ग्रहांच्या दुर्मिळ स्थितीमुळे शुभ योग तयार होणार आहे. त्यामुळे दिवसभर खरेदीसाठी शुभ मुहूर्त देखील असणार आहे.

अधिक वाचा- उद्धव ठाकरेंची साथ न सोडलेल्या 'या'आमदाराला मिळालं मोठं गिफ्ट

तिथी, नक्षत्र आणि दिवसाचा शुभ योगायोग

11 ऑगस्टला पौर्णिमा आणि श्रावण नक्षत्र या दिवशी गुरुवारचा शुभ संयोग होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या योगाचे वर्णन खरेदीसाठी शुभ मुहूर्त म्हणून करण्यात आले आहे. ज्यामध्ये वाहने, मालमत्ता, दागिने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर गोष्टींची खरेदी दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल. तसंच कोणत्याही नवीन सुरुवातीसाठी हा दिवस खूप चांगला असेल. या दिवशी नोकरी, मोठे व्यवहार किंवा गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. श्रावण नक्षत्र असल्याने वाहन खरेदीसाठी संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे.

200 वर्षांनंतर दुर्मिळ योग

दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, पुरीचे ज्योतिषी डॉ. गणेश मिश्रा सांगतात की, गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी आयुष्मान, सौभाग्य आणि ध्वज योग असेल. यासोबतच शंख, हंस आणि सत्कीर्ती नावाचे राजयोगही बनत आहेत.  गुरू-शनि प्रतिगामी होऊन आपल्या राशीत राहतील. ताऱ्यांची अशी दुर्मिळ अवस्था गेल्या 200 वर्षांत घडलेली नाही. या महान योगायोगात केलेले रक्षाबंधन सुख, समृद्धी आणि आरोग्य देईल.

ज्योतिषी काय सांगतात 

11 ऑगस्ट रोजी पौर्णिमा रात्री 9:35 वाजता सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी सकाळी 7.16 पर्यंत असेल. दुसरीकडे, भद्रा गुरुवारी सकाळी 10.38 वाजता सुरू होईल आणि रात्री 8.25 वाजता संपेल. त्यामुळे काशी विद्या परिषदेसह उज्जैन, हरिद्वार, पुरी आणि तिरुपती येथील विद्वानांचे म्हणणे आहे की, भद्राचा वास आकाशात असो वा स्वर्गात, भद्राचा काळ पूर्णपणे संपेपर्यंत रक्षाबंधन करू नये. त्यामुळे गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी रात्री 8.25 नंतरच रक्षाबंधन साजरी करावी, असं सर्व ज्योतिषीनी एकमतानं सांगितलं आहे. 

11 ऑगस्टला का बांधू नये दिवशी राखी

काही लोकांचा असा विश्वास आहे की, 11 ऑगस्टला भद्रा अधोलोकात राहील. ज्याचा पृथ्वीवर कोणताही अशुभ परिणाम होणार नाही. त्यामुळे रक्षाबंधन पूर्ण दिवस करता येते, मात्र कोणत्याही ग्रंथात किंवा पुराणात याचा उल्लेख नाही, असे विद्वान परिषदेचे म्हणणे आहे. त्याचबरोबर ऋषीमुनींनी संपूर्ण भाद्र काळात रक्षाबंधन आणि होलिका दहन करणे अशुभ सांगितले आहे. त्यामुळे भद्राच्या वास्तव्याचा विचार न करता राखी पूर्णपणे पार पडल्यानंतरच बांधावी. त्याच वेळी, 12 तारखेला पौर्णिमा तिथी पहाटे फक्त 2 तासांसाठी असेल आणि प्रतिपदेला राहील. या योगामध्ये रक्षाबंधन करण्यासही मनाई आहे.

अधिक वाचा- कोल्हापुरात पावसाचं थैमान,पंचगंगेचं पाणी ही पात्राबाहेर; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

प्रदोष काळात राखी बांधणं शुभ 

रक्षाबंधनाच्या संदर्भात ग्रंथांमध्ये प्रदोष काळ सर्वोत्तम मानला आहे, असे विद्वानांचे म्हणणे आहे. म्हणजेच सूर्यास्तानंतरची सुमारे अडीच तासांची वेळ अत्यंत शुभ असते. दिवाळीत या काळात लक्ष्मीपूजन केले जाते. यावेळी केलेल्या कामाचा शुभ प्रभाव दीर्घकाळ टिकतो असे ज्योतिष ग्रंथात सांगण्यात आलं आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी