Rakshabandhan 2022: बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण रक्षाबंधन; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन हा एक पवित्र सण आहे. यावर्षी रक्षाबंधन हा सण 11 ऑगस्ट रोजी, गुरूवारी साजरा करण्यात येणार आहे.

Raksha Bandhan 2022
रक्षाबंधन २०२२ 
थोडं पण कामाचं
  • भाऊ-बहिणीचा दिवस म्हणजे रक्षाबंधन सण.
  • रक्षाबंधन हा एक पवित्र सण आहे.
  • या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते.

मुंबई: Raksha Bandhan 2022: भाऊ-बहिणीचा दिवस म्हणजे रक्षाबंधन सण. रक्षाबंधन हा एक पवित्र सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. यावर्षी रक्षाबंधन हा सण 11 ऑगस्ट रोजी, गुरूवारी साजरा करण्यात येणार आहे.

असं म्हणतात, रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी बहिणी आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर संरक्षणाचा धागा बांधतात. ज्याला राखी म्हणतात. बहीण भावापासून आपल्या जीवाचं रक्षण करण्याचं वचन घेते. रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात. मात्र राखी बांधण्याची ही योग्य असते. त्याच वेळात राखी बांधली जावी. त्यामुळे रक्षाबंधन केव्हा आहे, शुभ मुहूर्त आणि भाद्र काळात या दिवशी राखी का बांधली जात नाही हे जाणून घेऊया.

अधिक वाचा- दररोज नारळ पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, मग आजपासून सुरू करा प्यायला 

जाणून घ्या शुभ मुहूर्त 

हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.38 पासून सुरू होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी, शुक्रवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 पर्यंत राहील. यंदा 11 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे.

भाद्र वेळ

  • भाद्र पूंछ - संध्याकाळी 5:17 ते संध्याकाळी 6.18 पर्यंत
  • भाद्र मुख- सायंकाळी 6:18 ते रात्री 8
  • भाद्र समाप्ती - रात्री 8:51 वाजता

म्हणून भाद्र काळात बांधू नये राखी

हिंदू धर्मानुसार, भाद्र काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यामुळे भाद्र काळात राखी बांधणं योग्य मानलं जात नाही. शास्त्रात भाद्र काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार लंकापती रावणाने भद्रामध्ये आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतली आणि वर्षभरातच तो नष्ट झाला. त्यामुळे ही वेळ सोडून बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात.

भद्रा ही शनि महाराजांची बहीण असल्याचंही सांगितलं जातं. तेव्हा ब्रह्म देवानं शाप दिला होता की जो कोणी भद्रामध्ये शुभ कार्य करेल त्याला त्याचं फळ अशुभच मिळेल. याशिवाय राहुकाळातही राखी बांधली जात नाही. रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावरच बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते.

(अस्वीकरण: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि सामग्रीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी