Ram Navami 2023 day date time auspicious yoga read in marathi: हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला राम नवमी साजरी करण्यात येते. धार्मिक मान्यतांनुसार, राम नवमीच्या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता. यामुळे या दिवशी राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी राम नवमीच्या दिवशी विशेष योग बनत आहे.
हे पण वाचा : उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे अद्भूत फायदे
ज्योतिष शास्त्रानुसार, राम नवमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी योगासह गुरुपुष्य योही तयार होत आहे. सर्वार्थसिद्धी आणि अमृत सिद्धी योग 30 मार्च रोजी सकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी सुरू होणार असून रात्री 10 वाजून 59 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतर अमृतसिद्धी योग, गुरु पुष्य आणि सर्वार्थ सिद्धी योग रात्री 10 वाजून 58 मिनिटांपासून ते सकाळी 6 वाजून 36 मिनिटांपर्यंत असणार आहे.
हे पण वाचा : हे शाकाहारी पदार्थ तुमचे मसल्स बनवतील बळकट
चैत्र नवरात्रीपासून राम नवमीपर्यंत आनंदाचे वातावरण सर्वत्र पहायला मिळते. श्रीरामाच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. कर्जातून मुक्ती मिळाल्याने उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. यासोबतच व्यवसाय आणि नोकरीत सुद्धा लाभ होईल.
हे पण वाचा : हात-पाय सुन्न होणे गंभीर आजाराचे लक्षण?
राम नवमीचा दिवस या राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम असणार आहे. नवीन काम आणि गुंतवणुकीसाठी हा दिवस चांगला आहे. थांबलेली कामे सुरळीत सुरू होतील. यासोबतच आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होईल.
हे पण वाचा : धूम्रपान करणे डोळ्यांसाठीही धोक्याचे
तूळ राशीच्या व्यक्तींना राम नवमीच्या दिवशी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल. अविवाहितांसाठी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. समाजात मान-सन्मान वाढेल.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही. आमचा उद्देश केवळ माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे इतकाच आहे त्यामुळे ती फक्त माहिती म्हणून घ्यावी.)