Navratri 2022: म्हणून नवरात्रीत लग्न करणे मानले जाते अशूभ, जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण

२६ ऑक्टोबरला घट बसून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ५ ऑक्टोबरला दसरा असून नऊ दिवसांचा हा उत्सव संपन्न होणार आहे. नवरात्र हा हिंदू धर्मांचा पवित्र सण आहे, असे असले तरी या काळात लग्न करणे अशूभ मानले जाते. जाणून घेऊया या मागील कारण.

marriage in navratri
नवरात्रीत लग्न करण्याचे नियम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • २६ ऑक्टोबरला घट बसून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे.
  • ५ ऑक्टोबरला दसरा असून नऊ दिवसांचा हा उत्सव संपन्न होणार आहे.
  • नवरात्र हा हिंदू धर्मांचा पवित्र सण आहे, असे असले तरी या काळात लग्न करणे अशूभ मानले जाते.

Navratri 2022: २६ ऑक्टोबरला घट बसून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. ५ ऑक्टोबरला दसरा असून नऊ दिवसांचा हा उत्सव संपन्न होणार आहे. नवरात्र हा हिंदू धर्मांचा पवित्र सण आहे, असे असले तरी या काळात लग्न करणे अशूभ मानले जाते. जाणून घेऊया या मागील कारण. (reason behind getting married in navratri is not allowed know reason read in marathi)

अधिक वाचा :  Dussehra 2022 Date, Muhurat: यंदा कधी आहे दसरा?, जाणून घ्या तारीख आणि पुजेचा शुभ मुहूर्त

नवरात्रीमध्ये अनेक शुभ कार्य केले जाते. नवरात्री हा हिंदू धर्मीयांचा पवित्र सण आहे. या काळात लोक भूमी पूजन, गृह प्रवेश, बाळसे, जावळ काढले जाते. या काळात पुजाही केली जाते. परंतु या काळात लग्न केले जात नाही. नवरात्रीमध्ये सर्व प्रकारच्या पूजा केल्या जातात त्यामुळे सुरू केलेले कार्य पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. या काळात दुर्गा मातेचे आशिर्वादही लाभतात. नवरात्रीच्या काळात भाविक नवीन गाडी घेऊ शकतात. हिंदू धर्मात नवरात्री ही शुभ आणि पवित्र मानली गेली आहे. शुभ दिन अणि शुभ मुहुर्ताला सुरू केलेल्या कामाचे उत्तम फळ मिळत. म्हणून या काळात गाडी घेणे शुभ मानले जाते.

अधिक वाचा :  Shardiya Navratri 2022: नवरात्रीत देवीच्या पूजेसाठी हे साहित्य खूप महत्त्वाचं, लिस्ट तयार करून आजपासूनच सुरू करा शॉपिंग

नवरात्रीमध्ये गृह प्रवेश हा देवीसाठी समर्पित आहे. या काळात देवीची मनोभावे पुजा केली जाते. या काळात देवी प्रसन्न होऊन भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते. हे ९ दिवस फार पवित्र आणि शुभ असतात. या काळात गृहप्रवेश झाल्यास माता देवीचा घरात वास होतो. तसेच घरात कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही.

अधिक वाचा : Navratri 2022 : नवरात्रीत काय करावे आणि करू नये...या 9 शुभ दिवसांमध्ये पाळा हे 10 महत्त्वाचे नियम

धर्मग्रंथानुसार नवरात्रीत देवी मातेचा भक्तांच्या घरात वास असतो. या काळात भक्त मानसिक आणि शारिरीक शुद्धता ठेवून व्रत वैकल्य करतात आणि देवीची पूजा करतात. लग्नाचा मुख्य उद्देश संतती प्राप्ती आहे. धर्मग्रंथानुसार नवरात्रीकाळात शरिरीक संबंध ठेवू नये. म्हणून नवरात्रीत लग्न करणे अशूभ मानले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी