Relationship problems: या ग्रहांमुळे नात्यांमध्ये येऊ शकतो कडवटपणा, संबंध सुधारण्यासाठी करा हे...

धर्म-कर्म-भविष्य
Updated Sep 24, 2020 | 13:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Relationships affected due to planetary movements: अनेकदा आपल्याच मुलांशी किंवा आईवडिलांशी असलेले आपले संबंध बिघडू लागतात. यामागे केवळ परिस्थितीच नव्हे, तर ग्रहांचा खेळही असतो.

Relationship issues
या ग्रहांमुळे नात्यांमध्ये येऊ शकतो कडवटपणा, संबंध सुधारण्यासाठी करा हे...  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • नाती बनण्यात आणि बिघडण्यात ग्रहांचा खेळही महत्वाचा असतो
  • सूर्य मजबूत असेल तर वडिलांशी घनिष्ट संबंध असतात
  • आजोळाशी असलेल्या संबंधांवर असतो बुध ग्रहाचा प्रभाव

ग्रह (Planets) मनुष्याला उंचीवर नेऊ शकतात तसेच अनेकदा जमिनीवरही आणू शकतात. याच ग्रहांमुळे काही वेळा दोन लोकांचे संबंध (relations between two people) अतिशय खास (very special) होतात तर अनेकदा क्षणभरात बिघडूही (relations deteriorate) शकतात. प्रत्येक ग्रहाचा एक खास गुण (special quality of each planet) असतो आणि त्यानुसार तो जातकांचे व्यवहारही नियंत्रित (behavior control) करतो. अनेकदा एका कुटुंबातच लोकांचे एकमेकांशी (strained family relations) पटत नाही. मुलगा-वडील किंवा मुलगा-आई, पती-पत्नी किंवा भाऊ-बहीण यांच्यात मतभेद असतात. यामागचे कारण परिस्थितीतही असते, पण या परिस्थितींना कारणीभूत असतात ग्रह. या जाणून घेऊया ग्रह नात्यांवर कसा प्रभाव टाकतात.

कोणत्या ग्रहांशी कसे संबंधित आहेत नातेसंबंध

सूर्य: पित्याशी नाते

सूर्याचा संबंध पित्याशी असतो. जर कुणाच्या कुंडलीत सूर्य मजबूत असेल तर पित्याशी पुत्र किंवा कन्येचा संबंध गहिरा असतो. तर सूर्य कमजोर असेल तर संबंध बिघडतात. सूर्याला मजबूती देण्यासाठी पित्याचा आदर करण्यासोबतच उगवत्या सूर्याला जल दाखवावे.

चंद्र: आईचे नाते

चंद्राचा संबंध आईशी असतो. चंद्र कमजोर असेल तर व्यक्ती अतिभावुक असण्यासोबतच अनेकदा निराश असतो. यामुळे त्याचे आईशी संबंध चांगले राहात नाहीत. चंद्राला मजबूत ठेवण्यासाठी रात्री त्याच्याकडे टक लावून पाहा आणि आईचे आशीर्वाद घ्या. सोबतच देवीची उपासना करा.

मंगळ: भाऊ-बहिणीचे नाते

मंगळ ग्रह हा भाऊ-बहिणीचे नाते घडवण्यास किंवा बिघडवण्यास कारणीभूत असतो. मंगळाला मजबूत करण्यासाठी हनुमानाची पूजा करा.

बुध: आजोळाशी नाते

आईच्या बाजूचे आजी-आजोबा आणि तिकडच्या घराशी असलेले संबंध कसे असतील हे बुध ग्रह ठरवतो. बुधाला मजबूत ठेवण्यासाठी गणपतीची पूजा करा. तसेच आजोळाहून एखादे झाड आणून आपल्या घरी लावा आणि वर्षातून एकदा जरूर आजोळी जा.

गुरू: आजीआजोबा आणि वयस्कर लोक

गुरू ग्रह हा आपले आजीआजोबांशी असलेले आपले नाते ठरवतो. गुरुवारी गुरूची पूजा करण्यासोबतच वेळोवेळी आजीआजोबांना कपडे आणि मिठाई द्या.

शुक्र: जोडीदाराशी संबंध

शुक्र ग्रह हा पती-पत्नींमधील संबंध चांगले राहण्यास किंवा बिघडण्यास कारणीभूत असतो. शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी घरी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची संयुक्त पूजा करावी.

शनि, राहू, केतू: सहकार्यांसोबत नाते

सहकार्यांशी नाते चांगले राहण्यासाठी हे तीन ग्रह मजबूत असावे लागतात. यासाठी आठवड्यातून एकदा त्यांना जरूर मिठाई द्या.

आता आपल्याला कळले आहे की कोणते ग्रह कोणत्या नात्यांवर कसा प्रभाव टाकतात. त्यामुळे सर्व नाती चांगली ठेवण्यासाठी संबंधित ग्रहांची पूजा करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी