Samudrik Shastra Tips: ओठांचा रंग आणि आकारावरून कळेल गर्लफ्रेंड कशी आहे? तिला काय हवे आहे?

Personality As per Lips : सुंदर ओठांमुळे फक्त माणसाचे व्यक्तिमत्त्वच खुलून येत नाही तर ते त्या व्यक्तीबद्दल बरेच काही सांगतात. सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराच्या प्रत्येक अवयवानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव, नशीब आणि त्याच्या कर्माविषयी बरीच माहिती मिळते. एखाद्या व्यक्तीचे किंवा तरुणीचे ओठ, त्यांचा वेगवेगळा आकार किंवा रंग काय सांगतात हे पाहूया. वेगवेगळ्या व्यक्तींचे ओठ वेगवेगळ्या आकाराचे असतात. त्यांचा रंगदेखील वेगळा असतो.

Personality as per lips
ओठांनुसार व्यक्तिमत्त्वाचे पैलू 
थोडं पण कामाचं
  • व्यक्तीच्या सौंदर्यात ओठांचे मोठे महत्त्व
  • सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराच्या प्रत्येक अवयवानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव, नशीब आणि त्याच्या कर्माविषयी माहिती मिळते
  • व्यक्तीचे ओठ त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी बरेच काही सांगतात

Samudrik Shastra Tips for Lips : नवी दिल्ली : कोणत्याही व्यक्तीच्या सौंदर्यात ओठांचे (Importance of Lips)मोठे महत्त्व असते. त्यातही महिलांच्या बाबतीत ते अधिक महत्त्वाचे ठरते. किंबहुना अनेक परंपरांमध्ये ओठांना सौंदर्याचे प्रतीक(Symbol of Beauty) मानण्यात आले आहे. सुंदर ओठांमुळे फक्त माणसाचे व्यक्तिमत्त्वच खुलून येत नाही तर ते त्या व्यक्तीबद्दल बरेच काही सांगतात. सामुद्रिक शास्त्रानुसार (Samudrik Shastra) शरीराच्या प्रत्येक अवयवानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव, नशीब आणि त्याच्या कर्माविषयी बरीच माहिती मिळते. एखाद्या व्यक्तीचे किंवा तरुणीचे ओठ, त्यांचा वेगवेगळा आकार किंवा रंग काय सांगतात (Personality as per lips) हे पाहूया. वेगवेगळ्या व्यक्तींचे ओठ वेगवेगळ्या आकाराचे असतात. त्यांचा रंगदेखील वेगळा असतो. याच गोष्टींच्या आधारावर तुम्ही त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याबद्दल जाणून घेऊ शकता. (Samudrik Shastra tips for personality as per shapes and colour of lips read in Marathi)

अधिक वाचा : Amazon Layoff Update : स्वत:हून राजीनामा दिल्यास चांगले फायदे....अ‍ॅमेझॉनची भारतीय कर्मचाऱ्यांना ऑफर, 10,000 कर्मचारी काढणार

ओठांच्या रंगावरून जाणून घ्या कोणाचा स्वभाव कसा आहे- (Personality as per lips)

गुलाबी ओठ
गुलाबी रंगाचे ओठ सुंदर दिसतात. ते लक्ष वेधून घेतात. कोणत्याही तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडचे ओठ गुलाबी रंगाचे असावेत असेच वाटते. शिवाय गुलाबी ओठ शुभ मानले जातात. गुलाबी ओठ असलेले लोक समजूतदार, शिक्षित, हुशार, बोलण्यात तेज आणि हुशार असतात. असे लोक कोणतेही काम इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने करतात असे मानले जाते.

लाल ओठ
लाल रंगाच्या ओठांचेही वेगळे वैशिष्ट्य असते. ज्या तरुणीचे किंवा व्यक्तीचे ओठ लाल रंगाचे असतात ते जर एखाद्या  सुंदर आणि हुशार असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार असे लोक त्यांच्या कामात निष्णात असतात. मात्र या लोकांना अहंकारदेखील लगेच येतो. ते अनेकवेळा तापटपणे वागतात. 

काळे ओठ
काठे ओठ असलेले लोक स्वभावाने भांडखोर असतात. कोणतेही कारण नसताना ते चीडचीड करतात. त्यांच्या या स्वभावामुळे ते इतरांमध्ये मिसळू शकत नाहीत. त्याचबरोबर इतर लोकही त्यांच्यापासून लांब राहतात. 

अधिक वाचा : FIFA World Cup 2022: 44 वर्षानंतर वर्ल्डकपमध्ये घडलेय हे....

ओठांचा आकार व्यक्तिमत्त्वाबद्दल काय सांगतो-

जाड ओठ
जाड ओठ असलेले पुरुष किंवा महिला यांच्या स्वभावात बेफिकिरी किंवा निष्काळजीपणा असतो. अगदीच महत्त्वाच्या काही गोष्टी सोडल्या तर ते जगात कशीचीही पर्वा करत नाहीत. ते अत्यंत आळशी असतात.

पातळ ओठ
पातळ ओठ असणारे लोक खूप महत्वाकांक्षी असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार असे लोक आपल्या करिअरबाबत खूपच सजग आणि चिंताग्रस्त असतात. आपल्याला यश मिळावे यासाठी ते वाटेल त्या थराला जातात. मात्र इतरांबरोबरची त्यांची वर्तवणूक ठीकठाक असते. 

कामुक ओठ
या प्रकारचे हे दिसायला सुंदर आणि आकर्षक असतात. कामुक ओठ असलेले पुरुष किंवा महिला प्रामाणिक, हुशार आणि बुद्धिमान असतात. आपल्या परिश्रमाच्या जोरावर ते जीवनात सर्वकाही मिळवतात. सुरूवातीला अशा प्रकारच्या लोकांना थोडी अधिक मेहनत करावी लागते मात्र त्यातूनच शेवटी ते यशस्वी होतात. 

अधिक वाचा : Healthy drinks for winter : हिवाळ्यात ही पेये तुम्हाला ठेवतील निरोगी, शिवाय त्वचादेखील होईल चमकदार

आकारहिन ओठ
सामुद्रिक शास्त्रानुसार या प्रकारचे ओठ दिसायला अतिशय कुरूप आणि अनाकर्षक असतात. असे ओठ असणाऱ्यांचा स्वभावदेखील असाच असतो. त्यांना आकारहीन ओठ म्हणतात. असे लोक नेहमी उदास असतात आणि ते इतरापासून वेगळेच राहणे पसंत करतात. 

वक्राकर ओठ
हे ओठ व्यंगचित्रांतील ओठांप्रमाणे असतात. हे वरच्या बाजूला आणि वक्राकर ओठ असतात. असे लोक दिखाऊपणावर भर देतात. त्यांच्याकडे कोणतीही गोष्ट जितकी असेल त्यापेक्षा जास्त दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यामुळे ते अनेकवेळा संकटात सापडतात.

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी