Gadge Maharaj Death Anniversary 2022 Quotes: थोर संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त वाचा त्यांचे ९ अमूल्य विचार

Gadge Maharaj Death Anniversary 2022: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज (Gadge Maharaj Death Anniversary) यांची आज पुण्यतिथी आहे.

 sant gadge maharaj Death Anniversary learn their 9 invaluable thoughts read in marathi
गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त वाचा त्यांचे ९ अमूल्य विचार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज (Gadge Maharaj Death Anniversary) यांची  20 डिसेंबर रोजी पुण्यतिथी असते.
  • अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन हेच गाडगेबाबांचे ध्येय होते.
  • दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करायचे. संत गाडगेबाबा जिथे कुठे जायचे तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यायचे.

Gadge Maharaj Death Anniversary 2022 Quotes in marathi : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज (Gadge Maharaj Death Anniversary) यांची  20 डिसेंबर रोजी पुण्यतिथी असते. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन हेच गाडगेबाबांचे ध्येय होते. दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करायचे. संत गाडगेबाबा जिथे कुठे जायचे तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यायचे. गावातील अनेकांनी दिलेला पैसा त्यांनी समाजविकासाठी खर्च केला. या पैशांतून त्यांनी गावांमध्ये शाळा, धर्मशाळा, रुग्णालय आणि जनावरांसाठी निवारा बांधला. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ( sant gadge maharaj Death Anniversary learn their 9 invaluable thoughts read in marathi)

अधिक वाचा : लखनऊमध्ये हे ठिकाणं आहेत पाहण्यासारखी

गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगांव येथे झाला आहे. तर लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

अधिक वाचा : अशी जोडपं बनत असतात परफेक्ट कपल

अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरले. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली आहेत. तर, जाणून घेऊया संत गाडगेबाबा यांचे 9 अमूल्य विचार.

Sant Gadge Maharaj jayanti Quotes in marathi 1

Sant Gadge Maharaj jayanti Quotes in marathi 2

Sant Gadge Maharaj jayanti Quotes in marathi 3

Sant Gadge Maharaj jayanti Quotes in marathi 4

Sant Gadge Maharaj jayanti Quotes in marathi 5

Sant Gadge Maharaj jayanti Quotes in marathi 6


संत गाडगेबाबा यांचे 9 अमूल्य विचार-

- भुकेलेल्यांना खायला अन्न द्या,  तहानलेल्यांना पाणी द्या.

- गरिब आणि कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्न कार्यात मदत करा.

- दु:खी आणि निराश लोकांना प्रोत्साहित करा.

- वस्त्रहीन लोकांना कपडे द्या.

- गरीब मुलांच्या शिक्षणास मदत करा, त्यांना चांगले शिक्षण मिळेल यासाठी योगदान द्या.

- अंध, अपंग, आजारी लोकांना मदत करा.

- बरोजगारांना रोजगार द्या.

- पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या.

- बेघर लोकांना आश्रय द्या.

गाडगे महाराज हे समतेचे पुरस्कर्ते होते. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप अपार कार्य आणि कष्ट केले. अखेर अमरावती येथे त्यांनी आपला देह ठेवला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी