Sant Goroba Kaka Punyatithi 2023 : संत गोरोबा काकांची पुण्यतिथीनिमित्ताने अभंग शेअर करून त्यांना अभिवादन करा

संत गोरोबा म्हणजेच गोरोबा काका हे वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जातात. संतकवी गोरोबाका यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तेर तालुक्यात इ.स.१२६७ साली झाला. नंतर अवघ्या पन्नासाव्या वर्षी आपल्याच गावी तेर येथे गोरोबाका काकांनी १३१७ मध्ये समाधी घेतली.

sant goroba kaka punyatithi 2023 share marathi messages on facebook whatsapp and social media
संत गोरोबा काकांची पुण्यतिथीनिमित्ताने अभंग करा शेअर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • संत गोरोबा म्हणजेच गोरोबा काका हे वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जातात. 
  • संतकवी गोरोबाका यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तेर तालुक्यात इ.स.१२६७ साली झाला. 
  • नंतर अवघ्या पन्नासाव्या वर्षी आपल्याच गावी तेर येथे गोरोबाका काकांनी १३१७ मध्ये समाधी घेतली.

Sant Goroba Punyatithi 2023 : मुंबई : संत गोरोबा म्हणजेच गोरोबा काका हे वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जाअता. संतकवी गोरोबाका यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तेर तालुक्यात इ.स.१२६७ साली झाला. नंतर अवघ्या पन्नासाव्या वर्षी आपल्याच गावी तेर येथे गोरोबाका काकांनी १३१७ मध्ये समाधी घेतली. वारकरी संप्रदायातील सर्वांत जेष्ठ संत, म्हणून त्यांना गोरोबा काका यांची ओळख आहे. ते मूळचे निर्गुणोपासक ज्ञानमार्गी होते. त्यांनी संत नामदेवांना निर्गुणोपासनेचा तसेच योगमार्गाचा उपदेश केला, परंतु नामदेवांनी आपला भक्तिमार्ग सोडला नाही. पुढे गोरोबा वारकरी संप्रदायात संत म्हणून गौरविले गेले. गोरा जुनाट पैं जुनें || हातीं थापटणे अनुभवांचे ||’ असे त्यांच्याविषयी म्हटले गेले. त्याचे २१ अभंग उपलब्ध आहेत. त्यांपैकी १५ अभंगात त्यांनी नामदेवांशी संवाद साधला आहे.आज संत गोरोबा यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने सोशल मीडियावर त्यांचे पुण्यतिथीनिमित्त फोटो शेअर करून अभिवादन करुया.

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम
गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ॥ १ ॥
ऐशा संतप्ते हो जाती । घडे साधूची संगती ॥ २ ॥
पूर्ण कृपा भगवंताची । गोरा कुंभार मागे हेंचि ॥ ३ ॥
गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन


कैसें बोलणें कैसें चालणें । परब्रह्मीं राहणें अरे नामा ॥ १ ॥
जेवी त्याची खूण वाढितांचि जाणे । येरा लाजिरवाणें अरे नामा ॥ २ ॥
म्हणे गोरा कुंभार अनुभवित जाणे । आम्हांतें राशी राहाणें असे नामा ॥ ३ ॥
गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन


रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी ॥ १ ॥
पुंडलिका झाला अनुताप । धन्य सत्य गुरु माय बाप ॥ २ ॥
गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

तुझ्या पदी वाहीला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा, सोडूनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठयाम
गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी