Sant Sevalal Jayanti 2023 Wishes in Marathi : संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारे शुभेच्छा संदेश 

Sant Sevalal Jayanti 2023 Wishes in Marathi : क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज (१५ फेब्रुवारी १७३९ - ४ जानेवारी १७७३ ) हे थोर मानवतावादी संत होते. शूरवीर लढवय्या बंजारा समाजाचे सतगुरू आहे. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला.

Sant Sevalal Jayanti 2023 Wishes in Marathi messages quotes greetings to wish your friend Family members on whatsapp facebook
संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन 
थोडं पण कामाचं
  • : क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज (१५ फेब्रुवारी १७३९ - ४ जानेवारी १७७३ ) हे थोर मानवतावादी संत होते.
  • शूरवीर लढवय्या बंजारा समाजाचे सतगुरू होते.
  • सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते

Sant Sevalal Jayanti 2023 wishes in Marathi : क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज (१५ फेब्रुवारी १७३९ - ४ जानेवारी १७७३ ) हे थोर मानवतावादी संत होते. शूरवीर लढवय्या बंजारा समाजाचे सतगुरू आहे. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते.  (Sant Sevalal Jayanti 2023 Wishes in Marathi messages quotes greetings to wish-your friend Family members on whatsapp facebook)

सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक-धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते. संत हाथीराम बाबा यासह हा शुरवीर बंजारा समुदाय त्यांना आपले आध्यात्मिक गुरू म्हणून मानतात. ते जगदंबेचे परम शिष्य होते. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले. रामावत क्षत्रिय कुळातील भीमासिंह नाईक यांचे ते चिरंजीव होते.ॉ

Sant Sevalal Jayanti 2023 Wishes

Sant Sevalal Jayanti 2023 Messages in Marathi । Photo : Timesnow Marathi

Sant Sevalal Jayanti 2023 Wishes 1

Sant Sevalal Jayanti 2023 Messages in Marathi । Photo : Timesnow Marathi
 

Sant Sevalal Jayanti 2023 Wishes 2

Sant Sevalal Jayanti 2023 Messages in Marathi । Photo : Timesnow Marathi

Sant Sevalal Jayanti 2023 Wishes 3

Sant Sevalal Jayanti 2023 Messages in Marathi । Photo : Timesnow Marathi

Sant Sevalal Jayanti 2023 Wishes 4

Sant Sevalal Jayanti 2023 Messages in Marathi । Photo : Timesnow Marathi


धर्मणीयाडी (मातोश्री)

संत सेवालाल महाराज यांच्या आईचे नाव धरमणी होते. ती जयराम वडतीया (सुवर्णा कप्पा, कर्नाटक) यांची राजकन्या होती. भीमा नायक यांच्या लग्नानंतर त्यांना जवळजवळ १२ वर्षे मूलबाळ नव्हते, पुढे जगदंबा मातेची पूजा व कृपेमुळे धर्मनी व भीमा नाईक यांना सेवालाल महाराज यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजात एक श्रद्धा आहे.

सेवालाल महाराज यांचे श्रीक्षेत्र रुईगड येथे निधन झाले. आणि महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी आजही जगदंबेच्या मंदिराशेजारी आहे. आध्यात्मिक आणि समाजप्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. सेवालाल महाराज यांची भविष्यवाणी आजही काळाच्या कसोटीवर तंतोतंत खरी ठरली आहे. बंजारा समाजातील महायोद्धा राजा लख्खीशाह बंजारा, गोर राजाभोज, शूरवीर गोविंद गोर, बाबा मख्खनशाह बंजारा, शूरवीर बल्लुराय बंजारा, वीरांगना मल्लिका बंजारन या शुर पराक्रमीच्या इतिहासाच्या शौर्यगाथा आजही लोकसाहित्यामधून दिसून येते. याबरोबरच संत सेवालाल महाराज आणि संत सामकी माता यांना समाजात विशेष आस्थेचे स्थान आहे.


संत सेवालाल महाराज यांची शिकवण

  1. जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा.
  2. कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका.
  3. सन्मानाने आयुष्य जगा.
  4. इतरांशी वाईट बोलू नका आणि इतरांना इजा करु नका.
  5. स्त्रियांचा सन्मान करा, आणि मुली जिवंत देवी आहेत.
  6. काळजी करू नका आणि संकटाला निर्भयपणे तोंड दया, धैर्यवान आणि आत्मविश्वासू जीवन जगा.
  7. पाण्याचे रक्षण करा आणि तहानलेल्यांना पाणीपुरवठा करा आणि कधीही पाणी विकण्यास गुंतवू नका जे सर्वात मोठे गुन्हा / पाप आहे.
  8. वडीलधारी माणसांचा आदर करा आणि तरुणांवर प्रेम करा आणि प्राण्यांचा देखील आदर करा.
  9. जंगलाला कधीही सोडू नका आणि जंगल नष्ट करू नका, जर आपण जंगल नष्ट केले तर आपण स्वतःला नष्ट करीत आहात.
  10. मनन केल्याने आंतरिक शांती मिळेल, आणि अभ्यास करा, ज्ञान मिळवा आणि ज्ञान इतरांना वाटा.
  11. माणुसकीवर प्रेम करा.
  12. आयुष्यावर तर्क करा आणि सर्व अंधश्रद्धायुक्त विश्वास टाळा.
  13. कुटूंबाची आणि समाजाची काळजी घ्या आणि समाजातील बंधुता कधीही भंग करु नका.
  14. धैर्य मानवतेच्या शिस्त, चिंतनशील आणि एक बुद्धीप्रामाण्यवादी संत होते. अंधकारात सापडलेल्या भक्तांना त्यातून मार्ग काढण्यासाठी सदोदित मार्गदाता म्हणून आजीवन भूमिका केली.


संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते. मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता , पर्यावरण रक्षण,गोरक्षाचा संदेश दिला. महाराष्ट्र व‌ तेलंगाना राज्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते. धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरूद्ध‌ लढा सुद्धा उभारला होता. समाजातील अनिष्ठ रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून‌ प्रहार चढवून सामाजिक सुधारणासाठी आग्रही भूमिका घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी