Shani Vakri 2022: ५ जूनपासून शनि चालतोय उलटी चाल; जाणून घ्या पुढील १४१ दिवस तुमचे कसे राहतील

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 07, 2022 | 12:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shani Vakri effect on Zodiac Sings । शनिदेव महाराजांना न्याय देवता मानले जाते. कारण ते सर्व प्राणीमात्रांना त्यांच्या शुभ-अशुभ कर्माचे फळ देत असतात. त्यांची सामान्य दृष्टीही मानवी जीवनात खळबळ माजवू शकते.

Saturn has been Vakri since 5th June. Find out how the next 141 days will be for you
५ जूनपासून शनि चालतोय उलटी चाल, या लोकांची वाढणार डोकेदुखी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • शनिदेव महाराजांना न्याय देवता मानले जाते.
 • शनिदेव सर्व प्राणीमात्रांना त्यांच्या शुभ-अशुभ कर्माचे फळ देत असतात.
 • शनिदेव कुंभ राशीमध्ये १४१ दिवसांपर्यंत वक्र चालीमध्ये मार्गस्थ असतील. 

Shani Vakri effect on Zodiac Sings । मुंबई : शनिदेव महाराजांना न्याय देवता मानले जाते. कारण ते सर्व प्राणीमात्रांना त्यांच्या शुभ-अशुभ कर्माचे फळ देत असतात. त्यांची सामान्य दृष्टीही मानवी जीवनात खळबळ माजवू शकते. जर शनि विरुद्ध दिशेने जाऊ लागला तर त्याचा वेगवेगळ्या राशींवर भयंकर प्रभाव दिसून येतो. या वर्षी २०२२ मध्ये ५ जून ते २३ ऑक्टोबर पर्यंत १४१ दिवस शनिदेव कुंभ राशीत वक्र चालीत राहतील. याचा परिणाम संपूर्ण मानवजातीवर दिसून येणार आहे. सनातन धर्म मानणारे शनिदेव महाराजांना प्रसन्न ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची चांगली प्रगती होते. (Saturn has been Vakri since 5th June. Find out how the next 141 days will be for you). 

अधिक वाचा : फ्रिजमध्ये चुकूनही ठेवू नका असे कलिंगड, वाचा सविस्तर

शनिच्या उलट चालीचा प्रभाव कसा राहील

शनिदेव कुंभ राशीमध्ये १४१ दिवसांपर्यंत वक्र चालीमध्ये मार्गस्थ असतील. चला तर म जाणून घेऊया याचा कोणत्या राशीवर कसा परिणाम होईल. 

 1. मेष राशी - शनिदेव महाराजांच्या प्रतिगामी हालचालीचा मेष राशीवर अनुकूल परिणाम होईल. यावेळी त्यांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच व्यवसायात वाढ होईल.
 2. मिथुन राशी - मिथुन राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. त्यांचे नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात अधिक लाभ होईल.
 3. वृषभ राशी - वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची प्रतिगामी स्थिती चांगली नसणार आहे. त्यांनी नवीन गुंतवणुकीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याची विशेष गरज आहे.
 4. कर्क राशी - कर्क राशीतील लोकांना या काळात अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. 
 5. सिंह राशी - शनीच्या प्रतिगामी गतीचा सिंह राशीवरही परिणाम होईल. यावेळी त्यांना तणावपूर्ण परिस्थितीतून जावे लागू शकते.
 6. कन्या राशी - कन्या राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यांना शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळेल.
 7. तूळ राशी - तूळ राशीच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक अडथळे येतील.
 8. वृश्चिक राशी - वृश्चिक राशीच्या लोकांनी अनावश्यक भांडणे टाळावीत. त्यांनी वादाच्या परिस्थितीपासून दूर राहिलेले केव्हाही चांगलेच असेल.
 9. मकर राशी - मकर राशीतील लोकांवर या काळात साडेसाती चालू आहे. या काळात रागावार नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
 10. धनु राशी - धनु राशीच्या लोकांवर शनीच्या प्रतिगामी गतीचा अनुकूल परिणाम होईल. त्यांचे उत्पन्न वाढेल. तसेच व्यवसाय देखील चांगला चालेल.
 11. कुंभ राशी - कुंभ राशीच्या लोकांवर शनिदेव महाराजांच्या उलट्या चालीचा प्रभाव दिसून येईल. या काळात अनावश्यक खर्च वाढू शकतो. 
 12. मीन राशी - मीन राशीच्या लोकांसाठी धनहानी होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीत त्यांना खूप काळजीपूर्वक पैसे गुंतवावे लागतील.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी