Astrology: ६ महिन्यांसाठी मकर राशीत जात आहेत शनिदेव; सोन्यासारखे चमकेल या ४ राशींचे नशीब

Shani Gochar July 2022 । शनि ग्रहाला न्याय देवता मानले जाते. कारण शनिदेव लोकांच्या कृतींवर अवलंबून सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम देतात. लक्षणीय बाब म्हणजे शनिचे एका राशीतून दुस-या राशीत संक्रमण होण्यास सुमारे अडीच वर्षे लागतात.

Shani Dev is going to Capricorn for 6 months, this people will get benefits
६ महिन्यांसाठी मकर राशीत जात आहेत शनिदेव, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ६ महिन्यांसाठी मकर राशीत जात आहेत शनिदेव.
  • शनि ग्रहाला न्याय देवता मानले जाते.
  • शनिदेव लोकांच्या कृतींवर अवलंबून सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम देतात.

Shani Gochar July 2022 । मुंबई : शनि ग्रहाला न्याय देवता मानले जाते. कारण शनिदेव लोकांच्या कृतींवर अवलंबून सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम देतात. लक्षणीय बाब म्हणजे शनिचे एका राशीतून दुस-या राशीत संक्रमण होण्यास सुमारे अडीच वर्षे लागतात. सध्या हा ग्रह स्वतःच्याच कुंभ राशीत संक्रमण करत आहे. पण १२ जुलैपासून शनि मकर राशीत संक्रमण करायला सुरूवात करेल. जिथे तो १७ जानेवारी २०२३ पर्यंत राहील. यानंतर तो पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करेल. चला तर म जाणून घेऊया मकर राशीतील शनिचा प्रवेश कोणत्या राशीसाठी फलदायी असेल. (Shani Dev is going to Capricorn for 6 months, this people will get benefits). 

अधिक वाचा : ‘या’ प्रश्नासाठी ओवैसी आणि वरुण गांधी एकत्र

  1. मेष राशी - या राशीचे लोक या कालावधीत करिअरवर लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी होतील. मोठ्या कालावधीपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे खूप सहकार्य मिळेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. तुमची मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.
  2. सिंह राशी - मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नोकरदारांना उत्तम यश मिळेल. करिअरमध्येही चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करू शकाल. तुम्ही एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे मिळवू शकाल.
  3. तूळ राशी - नोकरी पेशात असलेल्यांचे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तारासाठी अनेक चांगल्या संधी मिळतील. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. तुमची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या लोकांसाठीही वेळ अनुकूल आहे.
  4. मकर राशी - नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी स्वतःची ओळख निर्माण करता येईल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना हवी ती नोकरी मिळू शकते. तुमचे संवाद कौशल्य वाढेल. शुभ कार्य करणाऱ्या लोकांसाठीही वेळ अनुकूल आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगला फायदा होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी