How to remove Shani Dosh on Saturday : तुमच्यावर शनिची वक्रदृष्टी झाली आहे का? मग हे करा, नोकरी-व्यवसायात होईल प्रचंड फायदा

Shani Dosh : प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ शनिदेवामुळेच मिळते असे म्हणतात. त्यामुळेच जर एखाद्या व्यक्तीवर किंवा राशीवर शनिदेवाची वक्रदृष्टी झाली असेल तर त्यांना नोकरी आणि व्यवसायात मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. शनिवार हा शनिदेवाला समर्पित करण्यात आला आहे. त्यामुळेच शनिदेवाची उपासना करण्यासाठी शनिवारीच केली जाते.

Shani Dosh: How to remove Shani Dosh on Saturday
शनिदेवाची कृपा 
थोडं पण कामाचं
  • शनिदेवाला धर्मराज आणि न्यायाची देवता म्हटले आहे
  • एखाद्या राशीवर शनिदेवाची वक्रदृष्टी झाली असेल तर त्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते.
  • शनिवारी सकाळी स्नान करून शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.

How to remove Shani Dosh :नवी दिल्ली : भारतीय परंपरेत ज्योतिषशास्त्राचे (Astrology) मोठे महत्त्व आहे. त्यानुसार प्रत्येक राशीचे आणि ग्रहाचे स्वत:चे असे वैशिष्ट्ये आणि प्रभाव असतो. यानुसारच शनिदेवाला (Shanidev) धर्मराज आणि न्यायाची देवता म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ शनिदेवामुळेच मिळते असे म्हणतात. त्यामुळेच जर एखाद्या व्यक्तीवर किंवा राशीवर शनिदेवाची वक्रदृष्टी (Shani Dosh) झाली असेल तर त्यांना नोकरी आणि व्यवसायात मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. शनिच्या वक्रदृष्टीमुळे आर्थिक संकट येऊन कर्जबाजारीपणालादेखील तोंड द्यावे लागते. मात्र जर शनिदेव प्रसन्न (blessings of Shanidev) झाले तर नोकरी-व्यवसायात मोठी प्रगती होते आणि घरात आर्थिक सुबत्ता येते. त्याचबरोबर इतरही सर्व समस्या दूर होतात. (Do these 6 remedies on Saturday to get blessings of Shanidev read in Marathi)

अधिक वाचा  : नाशिकच्या घटनेनंतर पाहा नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ

अशी मान्यता आहे की शनिवार हा शनिदेवाला समर्पित करण्यात आला आहे. त्यामुळेच शनिदेवाची उपासना करण्यासाठी शनिवारीच केली जाते. शनिवारी सकाळी स्नान करून शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. शनिदेवाला प्रसन्न करण्याचे काही उपाय आहेत ज्यामुळे तुमच्या समस्या दूर होऊ शकतात. 

शनिदेवाला प्रसन्न करण्याचे उपाय- 

1. शनिदेवाच्या यंत्राची पूजा
तुम्ही जर आर्थिक संकटाला तोंड देत असाल, तुमची नोकरी किंवा व्यवसायात अनेक समस्या असतील तर शनिदेवाची उपासना तुम्ही केली पाहिजे. त्यासाठी शनिवारी सकाळी स्नान करून शनियंत्राची पूजा केल्याने फायदा होतो. तुमच्या समस्या दूर होत तुमच्या घरात सुबत्ता नांदते.

अधिक वाचा  : शिंदे ग्रुपचे आमदार बांगरांची कर्मचाऱ्यांना धमकी

2. शनि मंत्राचा जप
ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि मंत्रांचा जाप केला जातो. याचे खूप महत्त्व आहे. या मंत्रांचा जप केल्यामुळे समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. तुमच्या आर्थिक संकटांवर यामुळे मात होते. या मंत्रांचा प्रभावामुळे शनिदेव प्रसन्न होतात.
मंत्र:- ओम प्रीम प्रम सह शनैश्चराय नमः
मंत्र:- ॐ शं शनिश्चराय नमः

3. दान करणे
एरवीदेखील आपल्याकडे दानाचे मोठे महत्त्व आहे. शनिदेवाच्या कृपेच्या बाबतीत तर गरीबांना किंवा गरजू व्यक्तींना दान करण्याचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच जर तुम्हाला शनिदेवाची कृपा हवी असेल तर  काळा हरभरा, काळे तीळ, उडीद डाळ आणि स्वच्छ कपडे गरजूंना खऱ्या मनाने दान करत राहावे. यामुळे तुमच्या अडचणी दूर होतात.

4. भगवान शिवाची उपासना
शनिदेवाला प्रसन्न करण्याचा आणखी एक मोठा मार्ग म्हणजे भगवान शंकराची पूजा करणे. कारण भगवान शंकर हे शनिदेवाचे गुरु मानले जातात. त्यामुळे जर तुम्ही भगवान शंकराची पूजा केलीत, शिवलिंगावर तीळ ठेवले आणि जल अर्पण केले तर शनिदेव प्रसन्न होतात.

अधिक वाचा  : पेढ्यातून उंदराचं औषध देऊन केला अल्पवयीन मुलीचा खून

5. हनुमानाची पूजा
हनुमान आणि शनिदेव यांचे एकमेकांशी विशेष नाते आहे. त्यामुळेच जर तुम्ही हनुमानाची पूजा केली. तर शनिदेव नेहमी त्या व्यक्तीचे रक्षण करतात.

6. कुत्र्यांवर प्रेम
भारतीय परंपरेत प्राण्यांवर प्रेम करण्याचे मोठे महत्त्व आहे. एरवी आपण सर्व प्राण्यांवर प्रेम केले पाहिजे मात्र जर तुम्हाला शनिदेवाची कृपा हवी असेल तर कुत्र्यांची सेवा करावी. कुत्र्यांची काळजी घेणाऱ्यांवर शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात. जर तुम्ही कुत्र्यांना अन्न दिले, त्यांची काळजी घेतली तर शनिदेव कधीच कोपत नाहीत. अशा लोकांवर शनिदेवाची कृपादृष्टी राहते. 

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्या आधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी