Shani Gochar: आजपासून या ३ राशींवर होणार शनीची साडेसाती सुरू, या बाबतीत व्हा सावध!

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 12, 2022 | 13:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shani Gochar: शनी ग्रह पुन्हा एकदा मकर राशीत प्रवेश करत आहे. सोबतच तो मकर राशीत वक्री चाल खेळणार आहे. शनीच्या मकर राशीत प्रवेश करताच ३ राशींवर साडेसाती आणि त्याचा प्रभाव सुरू होईल. 

shani gochar
आजपासून या ३ राशींवर होणार शनीची साडेसाती सुरू, व्हा सावध! 
थोडं पण कामाचं
  • शनीने मकर राशीत प्रवेश करताच मिथुन राशीच्या व्यक्तींवर शनीची ढय्या सुरू होऊ शकते
  • शनीचे राशी परिवर्तन धनू राशीच्या लोकांसाठी चांगले असणार नाही.
  • शनीचे गोचर तूळ राशीच्या लोकांसाठीही चांगले असणार नाह

मुंबई: शनीने(shani) आज १२ जुलैला मकर राशीत प्रवेश केला आहे. गेल्या २९ एप्रिल २०२२ला शनीने मकर राशीतून बाहेर पडत कुंभ राशीत प्रवेश केला होता. आता तो पुन्हा आपली प्रिय राशी मकरमध्ये पोहोचला आहे. शनीने राशी बदलताच ३ राशीच्या लोकांवर पुन्हा साडेसाती सुरू होऊ शकते. तसेच एप्रिलमध्ये शनीने कुंभ राशीत येताच या राशीच्या लोकांची थोडी सुटका झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना शनीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या व्यक्तींवर १७ जानेवारी २०२३ पर्यंत शनीची महादशा राहणार आहे. shani gochar will effect on this 3 zodiac sign

अधिक वाचा - LinkedIn प्रोफाईलवर सांगितलं सेक्स वर्कला कामाचा अनुभव

या राशींना लागणार साडेसाती

मिथुन रास - शनीने मकर राशीत प्रवेश करताच मिथुन राशीच्या व्यक्तींवर शनीची ढय्या सुरू होऊ शकते. जानेवारी २०२३ पर्यंत त्यांना वादविवाद तसेच तणावापासून दूर राहिले पाहिजे. या दरम्यान खर्चातही वाढ होईल. या दरम्यान दुर्घटनेपासून बचाव करा. गाडी बघून चालवा. 

तूळ रास - शनीचे गोचर तूळ राशीच्या लोकांसाठीही चांगले असणार नाह. शनीने मकर राशीत प्रवेश करताच तूळ राशीच्या व्यक्तींवर शनीची ढय्या सुरू होत आहे. या व्यक्तींना मानसिक तणाव जाणवू शकतो. याशिवाय शारिरीक कष्टही झेलावे लागू शकतात. दरम्यान, तणावापासून दूर राहण्यासाठी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. 

अधिक वाचा - राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा

धनू रास - शनीचे राशी परिवर्तन धनू राशीच्या लोकांसाठी चांगले असणार नाही. या राशीवर पुन्हा शनीची साडेसाती सुरू राहणार आहे. दरम्यान ६ महिन्यांपर्यंत या व्यक्तींना पुन्हा शनीचा प्रकोप झेलावा लागेल. धनहानि होऊ शकते. मान-सन्मान कमी होईल. वाद होऊ शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी