Shani Jayanti 2022 : शनी जयंतीच्या दिवशी आहे विशेष सिद्धि योग, शनी देवाला करा असे प्रसन्न

३० मे २०२२ रोजी सोमवारी शनी जयंती साजरी केली जाणार आहे. दर वर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. शनी देवाला भगवान शंकरामुळे न्याय देवतेचा अधिकार मिळाला असे सांगितले जाते. यासाठी शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी विशेश पुजा अर्चना केली जाते.

shani jayanti
शनी जयंती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ३० मे २०२२ रोजी सोमवारी शनी जयंती साजरी केली जाणार आहे.
  • दर वर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते.
  • साडेसातीपासून सुरक्षा मिळण्यासाठी शनीदेवाची आराधना करणे गरजेचे आहे.

Shani Jayanti 2022 Date : ३० मे २०२२ रोजी सोमवारी शनी जयंती साजरी केली जाणार आहे. दर वर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. शनी देवाला भगवान शंकरामुळे न्याय देवतेचा अधिकार मिळाला असे सांगितले जाते. यासाठी शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी विशेश पुजा अर्चना केली जाते. साडेसातीपासून सुरक्षा मिळण्यासाठी शनीदेवाची आराधना करणे गरजेचे आहे. शनीचा प्रकोपामुळे व्यवसायात नुकसान होतं. आयुष्यात संकटं येतात. शनी देव सुर्याचे सुपुत्र आहेत. छाया देवी त्यांच्या मातोश्री आहेत,.  


शुभ योग

२९ मे रविवार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्णा पक्षाच्या अमावस्येला दुपारी २ वाजून ५४ मिनिटांनी अमवास्या सुरू होणार आहे. तर ३० मे ४ वाजून ५९ मिनिटांनी अमवास्या समाप्त होणार आहे. सुर्योदयानुसार शनी जयंती ३० मे रोजी सोमवारी साजरी केली जाईल. या दिवशी सुकर्मा योग आहे. तसेच सकाळी सर्वार्थ सिद्धी योग आहे आणि शनीदेवाच्या पुजेच्या दिवशी अभिजीत मुहुर्तसुद्धा आहे, 


या मंत्रांचा करा जाप

ऊं शं शनैश्चराय नमः
ऊं प्रां प्रीं प्रौ स: शनैश्चराय नमः
या मंत्रांचा जाप करत शनी जयंतीच्या दिवशी भगवान शनीदेवाची पुजा करा. यामुळे सर्व पापांचा नाश होईल. घरात शांती नांदेल, दुःख दूर होती, व्यवसायात तेजी मिळेल आणि संपत्ती वाढेल. 

(Disclaimer: सदर आशय उपलब्ध माहितीवर संकलित करण्यात आला आहे. या माहितीला टाइम्स नाऊ मराठी दुजोरा देत नाही)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी