shani sadesati Effect on zodiac sign । मुंबई: ज्योतिषशास्त्रात(jyotisha shastra) शनीला(shani) कर्मफळ दाता आणि भाग्य निर्माता म्हणून पाहिले जाते. कुंडलीतील(kundali) शनी जर चांगल्या स्थितीत असेल तर प्रत्येक ठिकाणी यश मिळते. मात्र शनीमध्ये जर गडबड असली तर जातकाला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. शनीची साडेसाती अनेक प्रकारे जातकाच्या आयुष्यावर परिणाम करत असते. अनेकदा ही साडेसाती काही बाबतीत लाभदायक ठरू शकते. मात्र अनेकदा ही साडेसाती त्या जातकासाठी हानिकारक ठरू शकते. ज्योतिषानुसार २०२२मध्ये एकूण ४ राशींवर(zodiac sign) शनिची साडेसाती असणार आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक...(shani sadesati will be effective on this 4 zodiac sign )
शनिच्या साडेसातीच्या प्रभावामुळे तुमचे साहस वाढेल. २०२२मध्ये शनिच्या कृपेने नेहमी भाग्याची साथ लाभेल. नोकरीमध्ये बढतीचे योग आहेत. व्यापारात थोडी सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे. कौटुंबिक त्रास कमी होईल.
कुंडलीच्या दुसऱ्या भावात शनीचा प्रवेश होईल. शनीच्या साडेसातीच्या प्रभावामुळे प्रॉपर्टीमध्ये आर्थिक लाभ होतील. परदेशी कंपन्यांमध्ये लाभ होईल. शनीच्या साडेसातीच्या अशुभ प्रभावामुळे अनावश्यक चिंता सतावेल. घरगुती प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या समस्येतून मार्ग निघेल. कर्जामुळे त्रस्त राहाल. मात्र जसा साडेसातीचा प्रभाव कमी होईल तशी चिंता दूर होईल.
शनी आपली जागा बदलून आपल्या कुंडलीतील पहिल्या भावात येणार. शनीच्या साडेसातीच्या प्रभावामुळे राजयोगासारखे सुख मिळेल. आरोग्यासंबंधित त्रास दूर होताना दिसतील. फालतू खर्चातून मोकळीक मिळेल. दरम्यान, वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफबाबत खूप सतर्क राहावे लागेल.
२०२२मध्ये साडेसाती सुरू होईल. या दरम्यान सतर्क राहावे लागेल. खासकरून आर्थिक प्रकरणांमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनात सावधानता बाळगावी लागेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी प्रेमाने बोलावे लागेल. याशिवाय बॉससोबतही चांगला ताळमेळ साधावा लागेल.