या ३ राशींवर सुरु होणार शनिदेवाची साडेसाती...

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 08, 2021 | 15:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

शनिच्या साडेसातीचे नेहमीच नकारात्मक परिणामच असतात असे नाही तर अनेकदा सकारात्मक परिणामही होतात. मात्र शनीच्या साडेसातीमुळे अनेक त्रासांचा सामना करावा लागत असेल तर हे उपाय करू शकतात. 

shani
या ३ राशींवर सुरु होणार शनिदेवाची साडेसाती... 

थोडं पण कामाचं

  • ज्योतिषांनुसार जेव्हा शनिदेव राशीमध्ये परिवर्तित होतात तेव्हा त्याला साडेसाती म्हटले जाते.
  • ज्यांच्यावर यांची साडेसाती सुरू होते ती लवकर संपत नाही.
  • धनु राशीच्या लोकांी साडेसातीतून मुक्तता होईल. या दरम्यान कर्क आणि वृश्चिक राशीवरही शनिदेवाचा परिणाम होईल

मुंबई: न्यायाचे देवता असलेल्या शनिदेवाचे(shani dev) नाव ऐकताच अनेकजण घाबरत असतात. कारण असे मानले जाते की शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात. खासकरून शनिदेवाची साडेसाती(shani sadesati) हे ऐकताच असे वाटते की काहीतरी अशुभ घडणार आहे. मात्र ही चुकीची धारणा आहे. शनिच्या साडेसातीचे चांगले आणि वाईट परिणाम नेहमीच होत असतात. (shani sadessati on this zodiac sign)

ज्योतिषांनुसार जेव्हा शनिदेव राशीमध्ये परिवर्तित होतात तेव्हा त्याला साडेसाती म्हटले जाते. शनिदेवाच्या प्रत्येक पावलाचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. शनिदेव खूप कमी वेगाने पुढे सरकतात. त्यांचे राशी परिवर्तन इतरांच्या तुलनेने कमी होते. ज्यांच्यावर यांची साडेसाती सुरू होते ती लवकर संपत नाही. पुढील वर्षी २९ एप्रिल २०२२ला शनिदेवचे राशी परिवर्तन होईल. या दिवशी ते मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत येतील. 

या राशींवर होणार परिणाम

या दिवसापासून मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू होईल. मीन राशीवर साडेसाती सुरू होताच  कुंभ आणि मकर राशीवर याचा परिणाम होईल. याशिवा. धनु राशीच्या लोकांी साडेसातीतून मुक्तता होईल. या दरम्यान कर्क आणि वृश्चिक राशीवरही शनिदेवाचा परिणाम होईल. 

शनिच्या साडेसातीपासून बचावासाठी उफाय

हनुमानाची पुजा करा

शास्त्रांच्या मते एकदा शनिदेवांनी हनुमानाला वचन दिले होते की जे कोणी हनुमानाची पुजा करतील त्यांना शनिदेव त्रास देणार नाहीत. यासाठी शनिदेवाच्या साडेसातीच्या वाईट परिणांमांपासून वाचण्यासाठी हनुमानाची पुजा करा. तसेच हनुमान चालिसाचे पठण करा. याशिवा सुंदरकांडचे पठण करा आणि श्रीहनुमाष्टकचे पठण केल्याने शनिदेवाच्या साडेसातीपासून होणारे त्रास कमी होतात. 

शनिच्या बीजाचा करा मंत्र

शनिच्या साडेसातीच्या वाईट प्रभावापासून बचावासाठी शनिचे दान, मंत्र जाप आणि पुजा केल्याने यापासून सुटका मिळते. याशिवाय शनिच्या बीजाचा मंत्र “ऊँ प्रां प्रीं प्रौं स: शनये नम:”चा जप आणि बीज मंत्रानंतर शनि स्तोत्राचे पठण केल्याने लाभ होतात. याशिवाय शनीच्या साडेसातीदरम्यान शनी मंत्र ऊँ शं शनैश्चराय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप केल्यानेही शनिदेवाची कृपा राहते. 

पिंपळाच्या झाडाकडे दिवा लावा

जर एखाद्या व्यक्तीला शनीच्या साडेसातीमुळे त्रासांचा सामना करावा लागत असेल तर दररोज आणि खासकरून शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा. यामुळे फायदा होऊ शकतो. यामुळे शनिदेवाची कृपा राहते. 

शनिवारी करा उपवास

शनिसंबंधित दुष्प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही शनिवारी हवं तर उपवास करू शकता.तसेच शनिदेवाची पुजा केल्यानंतर त्यांना निळ्या रंगाचे फूल अर्पण करा. तसेच शनिशी संबंधित काळ्या उडदाची डाळ, काळी वस्त्रे, तेल, लोह, काळे तीळ यांचे दान करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी