मुंबई: ५ जूनला शनी वक्री झाले आहेत. त्याआधी २९ एप्रिलला शनीने राशी परिवर्तन केले होते. शनीने आपलीच राशी कुंभमध्ये ३० वर्षानंतर प्रवेश केला होता. शनी २०२४ पर्यंत कुंभमध्येच राहणार आहे. दरम्यान, यामधील काही महिन्यांसाठी वक्री चाल चालत मकर राशीत येणार. मात्र मोठ्या प्रमाणात शनी कुंभ राशीतच असणार आहे आणि याचा फायदा ३ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. या ३ राशी २०२४ पर्यंत खूप लाभ मिळवतील. या दरम्यान या राशी ताबडतोब पैसा कमावतील आणि करिअरमध्येही खूप प्रगती करतील.
अधिक वाचा - ‘या’ लोकांना विमान प्रवासावर बंदी, मोठा निर्णय
मेष राशी आणि मेष लग्न या दोन्ही जातकांसाठी शनीचे परिवर्तन खूप लाभदायक ठरणार आहे. त्यांचे इन्कम वाढेल. नोकरीपेशा लोकांचे सॅलरी वाढेल. तर व्यापाऱ्यांनाही नफा होईल. त्यांना मोठी डील मिळू शकते. इन्कमचे नवे मार्ग वाढतील. नोकरी बदलण्यासाठी इच्छुक लोकांना नवा जॉब मिळू शकतो. निळे उपरत्न धारण करणे आणि शनीसंबंधित उपाय केल्याने लाभ होतील.
वृषभ रास आणि वृषभ लग्नवाल्या लोकांसाठी २०२४ पर्यंतचा काळ चांगला राहणार आहे. शन कर्मक्षेत्र असलेल्या भावामध्ये गोचर करणार आहे. यामुळे करिअरमध्ये आशादायी फळ मिळेल. आतापर्यंत जे अडथळे येत होते ते दूर होतील. एकामागोमाग एक चांगली कामगिरी तुमच्या नावे होईल. पद-प्रतिष्ठा वाढेल. व्यापाऱ्यांना लाभ होई. नव्या आयडियाच्या माध्यमातून खूप पैसा कमवाल.
शनीचे गोचर हे धनू रास आणि धनू लग्नच्या व्यक्तींसाठी वरदान ठरू शकते. त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. साहस, पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. यामुळे कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. शत्रूंवर विजय मिळवू शकाल.
अधिक वाचा -CM उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एमआयएम आणि भाजप आक्रमक
वृश्चिक रास - या महिन्यात कुटुंबात धार्मिक कार्ये घडू शकतात. मान-सन्मान प्राप्त होईल. व्यापाराची स्थिती सुधारेल. लांब प्रवासाचे योग बनत आहेत. प्रवास यशस्वी होईल.
मेष रास - जून महिन्यात तुमचे कौटुंबिक जीवन सुखमय राहील. मित्रांच्या मदतीने धन प्राप्तीचे योग बनत आहेत. धार्मिक तसेच अध्यात्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल.
मीन रास - तुमच्यासाठी जूनमध्ये दाम्पत्यजीवन सुखी राहील. कुटुंबात सुख-शांती राहील. याचा परिणाम तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीवर होईल. तुम्ही या महिन्यात नवी संपत्ती खरेदी करू शकता.
मिथुन रास - नव्या व्यापाऱ्याचा काही योजना पूर्ण कराल. बौद्धिक कार्यातून उत्पन्नाचे स्त्रोत मिळू शकतात.