Shanishchari Amavasya 2023: शनिश्चरी अमावस्या म्हणजे काय, कधी आहे ही अमावस्या? या दिवशी आपल्या राशीनुसार करा दान अन् व्हा मालामाल

Shanishchari Amavasya 2023 Date and importance: 2023 मधील पहिली शनिश्चरी अमावस्या 21 जानेवारी रोजी आहे. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे.

Shanishchari Amavasya 2023 date auspicious puja vidhi muhurat daan upay importnace read in marathi
Shanishchari Amavasya 2023: शनिश्चरी अमावस्या म्हणजे काय, कधी आहे ही अमावस्या? या दिवशी आपल्या राशीनुसार करा दान अन् व्हा मालामाल 

Shanishchari Amavasya 2023 importance of daan : 2023 मधील पहिली अमावस्या 21 जानेवारी रोजी आहे. पौष महिन्याची अमावस्या शनिवारी येणार असून या अमावस्येला शनिश्चरी अमावस्या म्हणतात.  शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनिश्चरी अमावस्या म्हणतात. शनिश्चरी अमावस्येला स्नान-दान करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी नागरिकांनी आपल्या राशीनुसार दान केल्यास चांगले पुण्य मिळते. जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तीने शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी काय दान करावे. (Shanishchari Amavasya 2023 date auspicious puja vidhi muhurat daan upay importnace read in marathi)

शनिश्चरी अमावस्येचं महत्त्व (Importance of Shanishchari Amavasya)

शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची विधीवत पूजा करणे शुभ मानले जाते. याच्यासोबतच अमावस्येच्या दिवशी स्नान, दान करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्यास काल सर्प दोष आणि शनी साडेसाती, शनी ढैय्या पासून मुक्ती मिळू शकते.

Donate things as per zodiac sign on Shanishchari Amavasya

मेष / Aries

शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींनी मसूर डाळ, गूळ, लाल रंगाचे कपडे, लाल फूल, लाल चंदन, गहू, सोने, तांबे, केशर, कस्तूरी यापैकी काही दान करायला हवे. या राशीच्या व्यक्तींसाठी हे दान सर्वश्रेष्ठ दान असतं.

हे पण वाचा : रात्री दूध प्यायल्याने का होते?

वृषभ / Tauras

शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी वृषभ राशीच्या व्यक्तींनी तांदूळ, साखर, सफेद कपडे, तूप, चांदी, मोती, तेल, लोखंडी वस्तू यापैकी काही दान करायला हवे. असे केल्यास चांगले फळ प्राप्त होते.

मिथुन / Gemini

शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी हिरवे कपडे, फळ, तूप, पैसे, फूल, कापूर, शंख, पन्ना रत्न, सोने, हत्तीचे दात हे दान करणे शुभ मानले जाते.

हे पण वाचा : गरोदरपणात चेरी खाण्याचे फायदे

कर्क / Cancer

या राशीच्या व्यक्तींनी तांदूळ, सफेद कपडे, चंदन, सफेद फूल, साखर, चांदी, तूप, शंख, दही, मोती आणि कापूर दान करायला हवे. यामुळे लवकरच आनंदवार्ता मिळेल.

सिंह / Leo

या राशीच्या व्यक्तींनी गहू, मोती, कमळाचे फूल, लाल चंदन, लाल कपडे, सोने, तांबे इत्यादी दान करावे.

हे पण वाचा : हिवाळ्यात प्या गुळाचा चहा अन् जादू पहा

कन्या / Virgo

कन्या राशीच्या व्यक्तींनी तांब्याची भांडी, तूप, फळ, तांदूळ, हिरवे कपडे, शंख, हत्तीचे दात आणि तूप इत्यादी दान करावे.

तूळ / Libra

या राशीच्या व्यक्तींनी तांदूळ, साखर, पांढरे कपडे, हिरे, चांदी, मोदीचे दान करावे.

हे पण वाचा : जेवणात चुकून पडले जास्त मीठ तर असे करा झटक्यात कमी

वृश्चिक / Scorpio

शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी मसूर, लाल रंगाचे कपडे, गूळ, लाल चंदन इत्यादी वस्तूंचे दान केल्यास प्रत्येक कामात यश प्राप्त होते.

धनु / Sagittarius

या राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाचे धान्य, पिवळे कपडे, सोने, तूप, पिवळे फळ, हळद इत्यादी दान केल्यास त्यांची मनोकामना, इच्छा पूर्ण होते.

हे पण वाचा : कांदा चिरण्यासाठी वापरा आयडिया ढासू, येणार नाही डोळ्यात आसू

मकर / Capricorn

या राशीच्या व्यक्तींनी सात प्रकारचे अन्न, तिळ, कपडे, उबदार कपडे, निळ्या रंगाचे कपडे, फूल इत्यादी वस्तू दान करायला हव्यात.

कुंभ / Aquarius

कुंभ राशीच्या व्यक्तींनी तेल, सात प्रकारचे अन्न-पदार्थ, काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे, तलवार, शूज, लोखंडी वस्तू, उडीद डाळ इतक्या वस्तूंचे दान करावेत.

हे पण वाचा : हिवाळ्यात डाळिंबाचा रस पिण्याचे अनेक फायदे

मीन / Pisces

या राशीच्या व्यक्तींनी पिवळे कपडे, पिवळ्या रंगाचे अन्नधान्य, सोने, तूप, पिवळ्या रंगाचे फूल, हळद, पुस्तक, मध, साखर, मीठ इत्यादी वस्तू शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी दान कराव्यात.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी