Zodiac Sign:या एका राशीवर मेहरबान असतात शंकर देव, धन-दौलतीने भरलेली असते तिजोरी

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 13, 2022 | 17:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक राशीचे आराध्य देव असतात. आज आम्ही एक अशा राशींबद्दल सांगणार आहोत ज्यांचे आराध्य दैवत भोलेनाथ आहेत. 

horoscope
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचे आराध्य दैवत भगवान शंकर असतात.
  • या राशीवर चंद्राचे राज्य असते. याची स्मरणशक्ती अतिशय प्रखर असते.
  • कामाच्या ठिकाणी ते जोर लावून काम करतात आणि सगळ्यांकडून कौतुक करून घेतात.

मुंबई: ज्योतिषशास्त्रात(astrology) प्रत्येक राशीचा कोणता ना कोणता स्वामी ग्रह असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक राशीचे आराध्य दैवत असते. असे मानले जाते की व्यक्ती जर राशीनुसार त्या देवाची पुजा केल्यास त्याच्या जीवनात सुख-समृद्धीचे आगमन होते. जीवनात आनंद येतो. आज आपण अशाच एका राशीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे आराध्य दैवत भगवान शंकर असतात. जाणून घेऊया या राशीबद्दल..shankar god blessed this zodiac sign

अधिक वाचा - धक्कादायक... सांगलीमधील कुटुंब ओमानच्या समुद्रात बुडालं

या राशीवर होते भगवान शंकराची कृपा

ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचे आराध्य दैवत भगवान शंकर असतात. या राशीवर चंद्राचे राज्य असते. याची स्मरणशक्ती अतिशय प्रखर असते. कामाच्या ठिकाणी ते जोर लावून काम करतात आणि सगळ्यांकडून कौतुक करून घेतात. यांना सगळ्यांना घेऊन जायला आवडते. कोणताही व्यक्ती यांच्याकडे आकर्षित होते. मोठ्या अधिकाऱ्यांशी यांचे चांगले संबंध असतात. आपल्या स्वभावामुळे यांचे अधिक मित्र असतात. समाजात त्यांची एक वेगळी ओळख असते आणि मान-सन्मान असतो. 

शंकराच्या कृपेने मिळवतात खूप धन

ज्योतिषानुसार हे लोक खूप जिद्दी स्वभावाचे असतात. ज्या गोष्टी त्यांना मिळवायच्या असतात त्या ते मिळवतातच. बोलण्यात हे लोक खूप चतुर असतात. आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला आपलेसे करून घेतात. आपली बुद्धी आणि वाणीच्या जोरावर या आयुष्यात खूप पुढे जातात. तसेच खूप पैसा कमावतात. जसे पैसा कमावण्यात माहीर असतात तसेच पैसा खर्च करण्यातही यांना तोड नसते. त्यामुळेच यांच्याकडे जास्त पैसा जमा होत नाही. आपल्या सुख-सुविधांवर खूप पैसा खर्च करता. मात्र त्यानंतरही यांच्याकडे पैशाची कमतरता जाणवते. 

अधिक वाचा - RBI ने ओलावर ठोकला दीड कोटीचा दंड

समाजात हे लोक लोकांना घेऊन चालतात. हे लोक आपल्या बोलण्याचे पक्के असतात. एकदा यांनी एखाद्याला शब्द दिला तर ते मागे सरत नाहीत. कर्क राशीच्या व्यक्ती खूप दयाळू असतात. दुसऱ्यांची मदत करण्यास नेहमीच तत्पर असतात. त्यांना कोणाचे दुख: बघितले जात नाही. यासाठी एकदम इमोशनल होतात. हे लोक आपल्या लोकांना खुश ठेवण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाहीत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी