Shardiya Navratri 2022: कधीपासून सुरू होतेय शारदीय नवरात्र, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Shardiya Navratri 2022 Date: हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. यावेळी 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे.

Shardiya Navratri 2022 Date
शारदीय नवरात्री 2022 
थोडं पण कामाचं
  • येत्या बुधवारी म्हणजेच 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. तर 9 सप्टेंबरला अनंत चतुर्थी (Anant Chaturthi) आहे.
  • गणेशोत्सव (Ganeshotsav) आल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते नवरात्रीचे. गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्यानंतर नवरात्र येते.
  • अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या दरम्यान शारदीय नवरात्र (Sharadiya Navratri) साजरी केली जाते.

मुंबई: Shardiya Navratri 2022 Kalash Sthapana Shubh Muhurt: येत्या बुधवारी म्हणजेच 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. तर 9 सप्टेंबरला अनंत चतुर्थी (Anant Chaturthi) आहे. गणेशोत्सव (Ganeshotsav) आल्यानंतर सर्वांना वेध लागतात ते नवरात्रीचे. गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्यानंतर नवरात्र येते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या दरम्यान शारदीय नवरात्र (Sharadiya Navratri)  साजरी केली जाते. हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीचा उत्सव देवी शक्ती माँ दुर्गाला (Goddess Durga)  समर्पित आहे. या दरम्यान भक्त नऊ दिवस उपवास करतात आणि वेगवेगळ्या दिवशी दुर्गा देवीच्या नवीन रूपांची पूजा करतात. शारदीय नवरात्रीचे व्रत पाळल्यास आणि दुर्गादेवीची विधिवत पूजा केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. त्यामुळे यंदाची शारदीय नवरात्र कधी आहे हे जाणून घेऊया.  (Shardiya Navratri 2022 Date auspicious time and worship method in marathi)

यंदा कधी आहे शारदीय नवरात्र?

पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी केली जाणार आहे.

अधिक वाचा-  सोशल मीडियाची मैत्री पडली भारी, दोरीनं बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

नवरात्रीचा पहिला दिवस
प्रतिपदा तिथी, माँ शैलपुत्रीची पूजा आणि घटस्थापना - 26 सप्टेंबर 2022, सोमवार

नवरात्रीचा दुसरा दिवस
द्वितीया तिथी, माँ ब्रह्मचारिणी पूजा -27 सप्टेंबर 2022, मंगळवार

नवरात्रीचा तिसरा दिवस
तृतीया तिथी, माँ चंद्रघंटा पूजा - 28 सप्टेंबर 2022, बुधवार

नवरात्रीचा चौथा दिवस
चतुर्थी तिथी, माँ कुष्मांडा पूजा -29 सप्टेंबर 2022, गुरुवार

नवरात्रीचा पाचवा दिवस
पंचमी तिथी, माँ स्कंदमाता पूजा -30  सप्टेंबर 2022, शुक्रवार

नवरात्रीचा सहावा दिवस
षष्ठी तिथी, माँ कात्यायनी पूजा- 01 ऑक्टोबर 2022, शनिवार

नवरात्रीचा सातवा दिवस
सप्तमी तिथी, माँ कालरात्री पूजा - 02 ऑक्टोबर 2022, रविवार

नवरात्रीचा आठवा दिवस
अष्टमी तिथी, माँ महागौपूजा, दुर्गा महाष्टमी - 03 ऑक्टोबर 2022, सोमवार

नवरात्रीचा नववा दिवस
नवमी तिथी, माँ सिद्धरात्री पूजा, दुर्गा महानवमी पूजा -04 ऑक्टोबर 2022, मंगळवार

शारदीय नवरात्री 2022 घटस्थापना शुभ मुहूर्त 

  • अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा प्रारंभ - 26 सप्टेंबर 2022, पहाटे 3.24
  • अभिजीत मुहूर्त - 26 सप्टेंबर सकाळी 11.54 ते दुपारी 12.42 पर्यंत
  • घटस्थापना मुहूर्त - 26 सप्टेंबर 2022, 6. 20 AM - 10.19 AM

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी