Shardiya Navratri 2022:  नवरात्रीच्या नऊ दिवसांना समर्पित आहे नऊ रंग, जाणून घेऊया या नऊ रंगाचे महत्त्व आणि देवीच्या नऊ अवतारांबद्दल

नवरात्र हा नऊ दिवसाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मातील हा नऊ दिवसांचा सण माता दुर्गाच्या नऊ अवतारांसाठी समर्पित आहे.  दुर्गामातेने नऊ दिवस महिषासूर राक्षसाशी लढून त्याचा १० व्या दिवशी वध केला होता.  या नऊ दिवसांचे धार्मिक अर्थ आहे आणि प्रत्येक दिवसाला एक रंग समर्पित आहे. या दिवशी भक्त त्या रंगाचे कपडे परिधान करतात आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. आज आपण जाणून घेऊया या नऊ दिवसांचे आणि त्यांना समर्पित रंगाचे महत्त्व

navratra significance of nine days
वाचा नवरात्रीच्या नऊ रंगाचे आणि देवीच्या अवतारांचे महत्त्व  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नवरात्र हा नऊ दिवसाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
  • हिंदू धर्मातील हा नऊ दिवसांचा सण माता दुर्गाच्या नऊ अवतारांसाठी समर्पित आहे.  
  • जाणून घेऊया या नऊ दिवसांचे आणि त्यांना समर्पित रंगाचे महत्त्व

Shardiya Navratri 2022:  नवरात्र हा नऊ दिवसाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मातील हा नऊ दिवसांचा सण माता दुर्गाच्या नऊ अवतारांसाठी समर्पित आहे.  दुर्गामातेने नऊ दिवस महिषासूर राक्षसाशी लढून त्याचा १० व्या दिवशी वध केला होता.  या नऊ दिवसांचे धार्मिक अर्थ आहे आणि प्रत्येक दिवसाला एक रंग समर्पित आहे. या दिवशी भक्त त्या रंगाचे कपडे परिधान करतात आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात. आज आपण जाणून घेऊया या नऊ दिवसांचे आणि त्यांना समर्पित रंगाचे महत्त्व. (shardiya navratri 2022 importance of nine days and nine color read in marathi)

दुर्गा मातेचे नऊ अवतार आणि प्रत्येक अवताराचे रंग

दिवस पहिला :  शैलपुत्री  : शैलपुत्री ब्रह्म, विष्णू आणि महेश भगवानच्या सामूहिक शक्तीचा अवतार आहे. देवीचा अवतार शिवाच्या पत्नीच्या रुपात पुजले जाते. पहिला रंग लाल आहे, हा रंग क्रिया आणि उत्साहाला समर्पित आहे. 

दिवस दुसरा : ब्रह्मचारिणी: जो भक्त या देवीची पुजा करतो ब्रह्मचारिणी माता त्यांना प्रसन्न होते आणि त्यांना सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करते. दुसरा दिवसाचा रंग निळा आहे. निळा रंग हा शांती आणि शक्तिशाली ऊर्जेचे प्रतीक आहे. 

दिवस तिसरा : चंद्रघंटा: चंद्रघंटा हा देवीचा अवतार असून हा अवतार सौंदर्य आणि देवाच्या कृपेचे प्रतीक आहे.. या देवीची आराधना केल्यास आयुष्यात शांती आणि समृद्धी मिळते. या दिवसाचा रंग पिवळा आहे. 

दिवस चौथा : कुष्मुंडा: कुष्मुंडा अवताराला ब्रह्मांडाचे निर्मात म्हटले आहे. कुष्मुंडाने ब्रह्मांडाची निर्म्निती करत वनस्पतींनी हे विश्वर हिरवेगार केले अशी अख्यायिका आहे. म्हणून या दिवसाचा रंग हिरवा आहे. 

दिवस पाचवा : स्कंद माता: स्कंद माता ही कार्तिकेयची आई आहे. देवांनी राक्षसांच्या विरोधातील लढाईत कार्तिकेयला सेनापती म्हणून निवडले होते. या दिवसाचा राखाडी आहे. 

दिवस सहावा : कात्यायनी: कात्यायनीचा जन्म ऋषी काता दुर्गेच्या अवतारात झाला आहे. ही देवी नारंगी रंगाचे कपडे घालून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करते, त्यामुळे या दिवसाचा रंग नारंगी आहे. 

दिवस सातवा : कालरात्रि: देवीच्या या अवतराचा रंग सावळा आहे. देवीचा या अवताराची तीन डोळे असून त्यांचात प्रचंड तेज आणि आगीच्या ज्वाळा आहेत. देवीचा हा अवतार उग्र आहे आणि या देवीने सफेद रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हा रंग शांती आणि प्रार्थनेचे प्रतीक आहे. म्हणून या दिवसाचा रंग सफेद आहे. 

दिवस आठवा : महा गौरी : दुर्गामातेचा अवतार महागौरी ही बुद्धिमान आणि शांत आहे. हिमालयातील घनदाट जंगलात तपस्या केल्याने महागौरीचा रंग बदलला. त्यानंतर भगवान शंकराने या देवीला गंगेच्या पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ केले आणि त्यामुळे महागौरीचे रुप आणि सौंदर्य परत आले. या दिवसाचा रंग गुलाबी आहे, हा रंग नव्या सुरूवातीचा आणि आशेचे प्रतीक आहे. 

दिवस नववा : सिद्धिदात्री: सिद्धिदात्री या देवीच्या अवाताराकडे अलौकिक अशा उपचार शक्ती आहेत. या देवीच्या चार भूजा असून त्या सदैव प्रसन्नचित्त अवस्थेत असतात. देवीचा हा अवतार सर्व भक्तांना आईच्या रुपात आशिर्वाद देते. या दिवसाचा रंग आकाशी आहे, हा रंग आकाशाचे प्रतिनिधित्व करतो. 


वर्षभरात दोन नवरात्री साजर्‍या केल्या जातात. मार्च किंवा एप्रिल महिन्यातील साजरी होणार्‍या नवरात्रीला चैत्र नवरात्री म्हटले जाते. तर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येणार्‍या नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हटले जाते. या दिवशी भक्तगण उपवास करतात. तसेच सांयकाळी गरबा करून हा सण साजरा करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी