Ram Navami 2022 wishes : रामनवमी निमित्त व्हॉट्सऍप, फेसबुक आणि सोशल मीडियावर शेअर करा मराठी शुभेच्छा

Ram Navami 2022 Wishes in Marathi चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. यंदा १० एप्रिल २०२२  रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.  

ram nawami
श्रीराम नवमी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस.
  • या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता
  • यंदा १० एप्रिल २०२२  रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.  

Happy Ram Navami 2022  Wishes in Marathi : चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस. या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. यंदा १० एप्रिल २०२२  रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.  ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला.  (share ram nawami  marathi messages on WhatsApp Facebook and social media )

रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पण सर्वसाधारणपणे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला हळद कुंकू वाहिले जाते. त्यानंतर फुले वाहिली जातात. श्री रामाला केवडा, चंपा, चमेली आणि जुईची फुले वाहिली जातात. त्यानंतर त्याची आरती केली जाते. राम जन्माच्या दिवशी रामजन्म पाळणा अगदी हमखास गायिला जातो. 

या सोहळ्यामध्ये ग्रंथपठण, रामकथेचे निवेदन, गीत रामायण आधीचे पठण केले जाते.  महाराष्ट्रातील अनेक राममंदिरात मोठ्या प्रमाणावर रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र गेल्या वर्षी आणि यंदा कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे लॉकडाऊन असल्याने सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसंच यंदा मंदिरात जावून भक्तांना रामाचे दर्शन घेता येणार नाही. पण नाराज होऊ नका. रामनवमी निमित्त विविध संदेश,  Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images तुम्ही सोशल मीडियाद्वारे शेअर करुन रामनवमीचा उत्साह कायम ठेवू शकता.

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Ram Navami Wishes In Marathi)

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी

गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती !

दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला?

राम जन्मला ग सखी राम जन्मला

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून, कारण त्यांच्यासारखा राजा,

मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
 

दशरथ नंदन राम
दया सागर राम
सत्यधर्म पारायण राम
राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा
 

गंगे सारखी गोदावरी तीर्थ 
झाले प्रयाग सर्वात मोठी अयोध्या नगरी 
जिथे जन्मले प्रभू श्रीराम.

राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. 
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. 
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक बाणी, एक वचनी, 
मर्यादा पुरुषोत्तम 
असे आहेत आमचे प्रभू श्री राम, 
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी