Shattila Ekadashi 2023 Til Upay: पंचांगनुसार (panchang) प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला षटतिला एकादशीचा उपवास पाळला जातो. माघ महिन्यात येणाऱ्या या एकादशीमध्ये भगवान विष्णूची (Vishnu God) विधिवत पूजा (Worship)करण्याबरोबरच उपवास करण्याचा विधी आहे. यावेळी 18 जानेवारी बुधवारी रोजी आहे. या दिवशी तिळाला खूप महत्त्वा आहे. या दिवशी तिळाचे दान केल्यानं मोठा लाभ होत असतो. या तिळाने इतर कामे केल्याने काय फायदे होतात ते आपण जाणून घेणार आहोत. (Shattila Ekadashi : use sesame on shattila Ekadashi )
अधिक वाचा : श्रेयस अय्यरची बॉलिंग बघून विराट कोहलीची 'बोलती बंद'
शास्त्रानुसार, तिळाची उत्पत्ति ही विष्णू देवाच्या घामापासून झाली होती. यामुळे षटतिला एकादशीच्या दिवशी तीळ सहा प्रकारच्या कामासाठी वापरलं तर आपल्या जीवनात सुख-शांती, धन, वैभव येत असते. माघ महिन्यात येणाऱ्या या एकादशीमध्ये भगवान विष्णू देवाची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याची विधी आहे.
षटतिला एकादशीच्या दिवशी आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकावी. यानंतर या पाण्याने आंघोळ करावी. असे केल्याने रोगराई दूर होत असते. आध्यात्मिक ऊर्जा विकसित होईल.
अधिक वाचा : सुधीर तांबेंना काँग्रेस पक्षातून काढले बाहेर
षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाच्या तेलाने मालीश केल्यास शुभ फळ मिळेल. मालीश केल्याने सर्दी आणि फ्लूसोबतच अनेक आजारांपासून मुक्ती मिळेल.
विष्णू देवाचे तिलोदक म्हणजेच पंचामृतात तीळ मिसळून स्नान करावे. याशिवाय पितरांना अवश्य तीळ अर्पण करा. यामुळे विष्णू देवासह पितररांचा आशीर्वाद देखील मिळेल.
अधिक वाचा : संभाजी महाराजांविषयी 'या' गोष्टी माहिती आहेत का?
षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचे दान करावे. माणूस जितके तीळ दान करतो, तितक्या पापांपासून मुक्ती मिळते. दुसरीकडे, काळे तीळ दान केल्यास कुंडलीतीलशनी दोषापासून आराम मिळतो.
षटतिला एकादशीच्या दिवशी विधिवत पूजा केल्यानंतर हवन साहित्यात काळे तीळ मिसळावे. यानंतर हवन करताना ते अर्पण करा. हवन केल्याने घरात सुख-शांती राहते .
एकादशीच्या दिवशी तिळाच्या तेलाने शरीराची मालिश करणे, तिळाच्या पाण्यातील पान खाणे आणि या दिवशी तिळाने बनवलेले पदार्थ खाण्याचा विधी आहे. पांढऱ्या तिळापासून बनवलेल्या पदार्थ खाण्याचे महत्त्व अधिक सांगितले आहे. या दिवशी विष्णू देवाची विशेष पूजा करावी. ही पूजा तीळाने करावी.
1. या दिवशी उपवास पकडणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान करावे.
2. यानंतर पूजास्थानाची स्वच्छता करावी. आता भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती, मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे.
3. भाविकांनी नियमानुसार प्रार्थना करावी.
4. पूजेदरम्यान भगवान श्रीकृष्णाचे स्तोत्र आणि विष्णु सहस्रनामाचे पठण करावे.
5. देवतांना प्रसाद, तुळशीपाणी, फळे, नारळ, अगरबत्ती आणि फुले अर्पण करावीत.
6. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे द्वादशीला पूजेनंतर अन्न सेवन केल्यावर षटीला एकादशीचे व्रत मोडावे.