शिव कुटुंबाची पूजा केल्याने मिळते ग्रहदोषांपासून मुक्ती

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 22, 2019 | 09:54 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

शिव कुटुंबात शिवजींसोबत माता पार्वती, दोन्ही पुत्र कार्तिकेय तसेच गणेश, या सगळ्यांचे वाहन तसेच नंदीचीही पुजा केली जाते. कोणत्याही शुभ कार्य तसेच पूजनाचा प्रारंभ गणेश पुजेने होतो.

shiv family
शिव कुटुंब 

थोडं पण कामाचं

  • शिव कुटुंबाची विधिवत पुजा
  • कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणेशाच्या पुजेने
  • माता पार्वतीच्या पुजेशिवाय भगवान शंकराची पुजा अपूर्ण

मुंबई: ज्योतिषाचार्य सुजीत महाराज यांच्यानुसार शिवकुटुंबाची एकत्रित पुजा करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याशिवाय तुमच्या मनोकामना पूर्ण होणार नाहीत. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात तसेच पुजेचा प्रारंभ गणेशाच्या पुजनाने होतो. गणपती बाप्पा विघ्न दूर करणारे म्हणजे विघ्नहर्ता मानले जातात. एखादे कार्य संपन्न करण्यासाठी ते सहाय्यक असतात. हिंदू धर्मात त्यांच्या पुजेशिवाय कोणतीच कार्ये संपन्न होत नाहीत. गणपतीला दूर्वा अतिशय प्रिय आहेत. तसेच त्यांना जास्वंदाचे फूल आणि मोदकाचा प्रसाद आवडतो. गणपतीचा भाऊ कार्तिकेय. कार्तिकेयही बुद्धीची देवता मानली जाते. कार्तिकेयच्या पुजनाने सुख-समृद्धीचा लाभ होतो. त्यामुळे गणपतीसोबत कार्तिकेयची पुजा केल्याने अनेक इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. 

पार्वतीशिवाय पुजा केल्यास लाभ मिळत नाही, जाणून घ्या पुजा-विधी

माता पार्वतीला शक्तीचे स्वरूप मानले जाते. माता पार्वतीशिवाय शंकराची पुजा अपुरी मानली जाते. याचे लाभ कमी होतात. पार्वती हेच दुर्गेचे रूप आहे. शिवलिंगाजवळ बसून दुर्गासप्तशतीचे पठण करा. माता पार्वतीला ओढणी अर्पण करा. त्यांची विधिवत पुजा करा. यामुळे माता पार्वतीची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहते. 

शिवलिंगाजवळ सिद्धीकुंजिकस्तोत्राचे पठण केल्यास माता तसेच शिव दोघेही प्रसन्न होत अभिष्ट वर प्रदान करतात. कुमारिकांनी माता पार्वतीचे पूजन केल्यास तसेच श्री रामचरितमानसमध्ये वर्णन केलेल्या शिव पार्वती प्रसंगाचे पठण करा. आपल्या सफल वैवाहिक जीवनासाठी अरण्या कांडचे पठण करा. संतानाच्या उन्नतीसाठी पार्वती मातेच्या १०८ नावांचा १८ वेळा जप करा. 

दूध तसेच गंगाजलाने घाला नंदीला स्नान

नंदी पुजेचे तितकेच अधिक महत्त्व आहे. नंदीची पुजाही महत्त्वाची मानली जाते. नंदीची विधिवत पुजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. नंदी पुजेला गायीचे दूध अथवा गंगाजलने स्नान घालणे महत्त्वाचे असते. बेलपत्र तसेच अनेक प्रकारचे फळे चढवा. आपल्या मनोकामना नंदीजीच्या कानात सांगा. यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतील. नंदीच्या पुजनाने भगवान शिव प्रसन्न होतात. तसेच तुम्ही जे नंदीच्या कानात सांगितल्याने भगवान शंकरापर्यंत पोहोचतात. 

याप्रकारे भगवान शंकराच्या कुटुंबाची विधिवत पुजा केल्यास जीवनात अनेक लाभ मिळतात. तसेच भगवान शंकराची कृपादृष्टी राहते. भगवान शंकराचे आशीर्वाद मिळतात. तसेच जीवन सफल होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
शिव कुटुंबाची पूजा केल्याने मिळते ग्रहदोषांपासून मुक्ती Description: शिव कुटुंबात शिवजींसोबत माता पार्वती, दोन्ही पुत्र कार्तिकेय तसेच गणेश, या सगळ्यांचे वाहन तसेच नंदीचीही पुजा केली जाते. कोणत्याही शुभ कार्य तसेच पूजनाचा प्रारंभ गणेश पुजेने होतो.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...