नवी दिल्ली: पुढच्या आठवड्यात श्रावण (Shravan) महिना सुरू होत आहे. श्रावणातील सोमवारी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्त पूजा, व्रत करत असतात. तसंच शिवलिंगाचीही पुजा (puja) करतात. अशा वेळी शंकराला (Lord Shiva) प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर विविध वस्तू अर्पण केल्या जातात. शंकराची पूजा करताना शिवलिंगावर गंगाजल, बेल पत्र, धोत्रा, भांग, कापूर, दूध, तांदूळ, चंदन, भस्म या आणि अशा अनेक वस्तू अर्पण केल्या जातात. पण याव्यतिरिक्त अशी एक गोष्ट आहे जी भगवान शंकराला खूप प्रिय आहे. ज्योतिषीचं म्हणणं आहे की, ही एक वस्तू शिवलिंगावर अर्पण केली तर व्यक्तीचं भाग्य उजळते. 29 जुलै रोजी श्रावणातला पहिला सोमवार आहे.
रुद्र आणि शिव समानार्थी शब्द आहेत. रुद्र हे शिवाचे उग्र रूप आहे. भगवान शंकराला रुद्राक्ष अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. शास्त्रामध्ये रुद्राक्षाचे वर्णन हे भगवान शंकराचा महाप्रसाद म्हणून करण्यात आलं आहे. असं म्हणतात की, भगवान शिवाच्या अश्रूंपासून जन्मलेल्या रुद्राक्षात दुर्दैवाचे रूपांतर सौभाग्यामध्ये करण्याची शक्ती असते. हे केवळ भगवान शिवालाच अर्पण केले जाऊ शकत नाही. उलट ते परिधानही करता येते. हे धारण केल्यानं जीवनातील सर्व समस्या, रोग, दुःख आणि भीतीपासून मुक्ती मिळते.
भगवान शंकराला रुद्राक्ष कधी अर्पण करावा?
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ठरलेल्या मुहूर्तावर तुम्ही शिवलिंगाला रुद्राक्ष अर्पण करू शकता. ब्रह्म मुहूर्त पहाटे 04:13 ते 04:54 पर्यंत राहील. यानंतर अभिजित मुहूर्त दुपारी 12 ते 12.55 पर्यंत असेल. त्यानंतर दुपारी 02.45 ते 03.40 पर्यंत विजय मुहूर्त असणार आहे. दरम्यान, तुम्ही कधीही शिवलिंगावर रुद्राक्ष अर्पण करू शकता.
शिवलिंगाला रुद्राक्ष अर्पण करताना यजुर्वेदातील रुद्राष्टाध्यायी या मंत्रांचे पठण केलं जातं. यामुळे तुमच्या मनोकामना इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. तसंच कुंडलीतील ग्रह दोषांचा प्रभावही कमी होतो. रुद्राक्ष अर्पण करण्यासाठी शिवाची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे. म्हणून भगवान शंकराच्या ठिकाणी जाऊन शिवलिंगावर अर्पण करा.