Shravan Mahina : उत्तर भारतात उद्यापासून सावन महिना सुरू होणार आहे. तर महाराष्ट्रात श्रावण महिना २९ जुलैपासून सुरू होणार आहे. श्रावण महिन्यात चार सोमवार असतात. श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय असतो. म्हणूनच या महिन्यात शिवभक्त मनापासून भगवाव शंकराची पुजा करतात. तसेच दर श्रावणी सोमवारला उपवास करतात. काही लोक तर संपूर्ण महिना उपवास आणि व्रत वैकल्य करतत. जाणून घेऊया श्रावणी सोमवारच्या दिवशी उपवास करताना कुठले पदार्थ खावे आणि कुठले टाळावे
श्रावण महिन्यात खुप पाऊस असतो. त्यामुळे या महिन्यात खाण्यापिण्यात थोडी खबरदारी घ्यावी. कारण पावसाळ्यात तब्येत बिघडण्याची शक्यता असते. श्रावणी सोमवारच्या दिवशी नियमांनुसार उपवासाच करताना सात्विक पदार्थ खवीत. यावेळी फळांचा आहार घ्यावा त्यात सफरचंद, केळी, डाळींब, पेर या फळांचा समावेश आहे. उपवासाच्या दिवशी दूध, फळांचा रस आणि सुका मेवाही खावा. उपवासाच्या दिवशी आंबट पदार्थ टाळावेत.
श्रावणी सोमवारचा उपवास हा निर्जळी उपवास नसतो. या दिवशी तुम्ही सैंधव मीठ असलेले पदार्थ खाऊ शकता. या दिवशी सातत्याने खाऊ नये किंवा फळे ही सारखी सारखी खाऊ नये. उपवासाच्या दिवशी लसूण, कांदा, मीठ, मिरचीचे सेवन करू नये. संपूर्ण श्रावणात मांसाहार करू नये तसेच दारूही पिऊ नये.
या वर्षी शुक्रवार २९ जुलै पासून श्रावणी सोमवार सुरू होणार आहे.
या वर्षी श्रावणात चार सोमवार आहेत, त्यादिवशी उपवास केले जातील. श्रावणात उपवास केल्यास भगवान शंकराची विशेष कृपा असते तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते असे सांगितले जाते.
(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही)