Grah Gochar November 2022:  नोव्हेंबर महिन्यात एका राशीत शुक्र आणि बुध होणार गोचर, या चार राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Grah Gochar November 2022:   नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह दुसर्‍या राशीत प्रवेश करणार आहेत. नोव्हेंबरमध्ये या ग्रहांच्या गोचरमुळे अनेक राशीच्या लोकांवर प्रभाव पडणार आहे. नोव्हेंबर महिन्यात एकदा पुन्हा एकच राशीत शुक्र आणि बुध देव गोचर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र देव 11 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तर बुध देव १३ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशी गोचर करणार आहे.

shukra and budh gochar
शुक्र आणि बुध गोचर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह दुसर्‍या राशीत प्रवेश करणार आहेत.
  • नोव्हेंबरमध्ये या ग्रहांच्या गोचरमुळे अनेक राशीच्या लोकांवर प्रभाव पडणार आहे.
  • नोव्हेंबर महिन्यात एकदा पुन्हा एकच राशीत शुक्र आणि बुध देव गोचर होणार आहे.

Grah Gochar November 2022:  नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह दुसर्‍या राशीत प्रवेश करणार आहेत. नोव्हेंबरमध्ये या ग्रहांच्या गोचरमुळे अनेक राशीच्या लोकांवर प्रभाव पडणार आहे. नोव्हेंबर महिन्यात एकदा पुन्हा एकच राशीत शुक्र आणि बुध देव गोचर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र देव 11 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तर बुध देव १३ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशी गोचर करणार आहे. हे दोन्ही ग्रह एकाच राशीत प्रवेश करणार असल्यामुळे अनेक राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. जाणून घेऊया या गोचरमुळे कुठल्या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. (shukr and budh gochar in vrushchcik rashi these zodiac sign benefits read in marathi)

अधिक वाचा : Chandra Grahan 2022: 15 दिवसांत होणार दुसरे ग्रहण! वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाचा असा होईल परिणाम

वृषभ राशी

नोव्हेंबरमध्ये शुक्र आणि बुध राशी वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांचा आगामी काळ चांगला जाणार आहे. व्यापारात लाभ होणार आहे. तसेच विवाहेच्छूक तरुण आणि तरुणींना मनपसंत स्थळ मिळणार आहे. गोचर काळात वृषभ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. 

अधिक वाचा : Chanakya Niti: साध्या आणि प्रामाणिक पुरुषांना स्त्रिया का मानतात मूर्ख? कारण जाणून बसेल धक्का

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना बुध आणि शुक्र देवाची साथ मिळणार आहे. घरात सुख समृद्धी येईल तसेच नवीन वाहन विकत घेण्याचा योग येईल. जमीनीसंबंधित व्यवहार फायदेशीर ठरेल. प्रॉपर्टीसंबंधित व्यवहार फायदेशीर ठरेल. नवीन उद्योग सुरू करण्याचा योग येईल

अधिक वाचा :  नोव्हेंबर 2022 मध्ये चमकणार 4 राशींचे नशीब

मकर राशी

मकर राशीच्या लोकांचा गोचर काळात पगार वाढण्याची शक्यता आहे. फॅशन, डिझाईन क्षेत्रातील लोकांचा कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. या काळात मकर राशीच्या लोकांची इच्छा पूर्ण होईल. सामाजित प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन लाभेल.

अधिक वाचा : Daily Horoscope 28 October: आजचे राशीभविष्य; या 2 राशींच्या व्यक्तींचा खर्च वाढणार, पाहा कशी असेल तुमची आर्थिक स्थिती

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांना गोचर काळात अनेक संधी मिळतील. करीअरसाठी हा योग्य काळ आहे, काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. करीअरमध्ये घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. तसेच नवीन गाडी घेण्याची संधी मिळेल. 

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी