Venus Remedies : मुंबई : हिंदू धर्म गुरू ग्रह हा देवांचा गुरू मानला गेला आहे. तर शुक्र ग्रह हा राक्षसांचा गुरू मानला जातो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहामुळे ऐश्वर्य, धन, संपत्ती, लग्नाचे सुख मिळते असे मानले जाते. आपल्या आयुष्यात जे कही भौतिक सुख मिळतं ते शुक्र ग्रहामुळे मिळतं असे सांगितले जाते. जर कुण्याच्या कुंडलीत शुक्राची स्थिती चांगली असेल आणि मित्र राशी स्वराशी असेल तर तुमचे आयुष्य कमी संकटाचे आणि अधिक सुखकर असणार आहे.
परंतु जर एखाद्याच्या कुंडलीत शुक्र कमजोर असेल तर आयुष्यात फार संकट येऊ शकतात. शुक्र जर कुंडलीतील अशुभ ठिकाणी असेल तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात संकट येऊ शकतात. शुक्रामुळे एका जोडप्यात दुःख निर्माण होऊ शकतात.
शुक्र कमजोर असल्याने अनेक प्रकारच्या व्याधी होऊ शकतात. शुक्र कमजोर असल्याने किडनीसंबंधित आजार होऊ शकतात. तसेच मधुमेह, डोळ्यांच्या समस्येंआगे शुक्र असतो.
कुंडलीतील शुक्र मजबूत करण्यासाठी खालील मंत्राचा जाप करा
ॐ शुं शुक्राय नम:।
ॐ हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं