Shukra Grah Gochar 2022 Benefits: ज्योतिषशास्त्रानुसार ७ ऑगस्टपासून शुक्र ग्रह कर्क राशीत गोचर म्हणजेच प्रवेश करणार आहे. सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी शुक्र ग्रह कर्क राशी प्रवेश करणार आहे. ३१ ऑगस्टपर्यंत शुक्र ग्रह कर्क राशीत असणार आहे. ३१ ऑगस्टनंतर शुक्र ग्रह सिंह राशीत गोचर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह हा सुख समद्धी, प्रेम आणि वैभवाचे प्रतीक मानले गेले आहे. शुक्र ग्रह ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशीचे भाग्य बदलते. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र गोचर काही राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया शुक्र गोचरमुळे कुठल्या राशीच्या लोकांचे भाग्योदय होणार आहे. (shukra gochar 2022 venus transit in cancer)
अधिक वाचा : Pithori Amavasya 2022: कधी आहे पिठोरी अमावस्या? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र गोचरमुळे मिथून राशीच्या लोकांना येत्या काळात खुप फायदा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळेल. तसेच व्यापारात यश मिळेल. तसेच भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही लाभ होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार ७ ऑगस्टपासून कन्या राशीच्या लोकांचे चांगले दिवस येणार आहेत. या काळात कन्या राशीच्या लोकांवर लक्ष्मीमातेची कृपा राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी मान सन्मान वाढेल.
मकर राशीच्या लोकांना गोचर काळात व्यवसायात यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. इतकेच नाही उत्पन्नही वाढणार आहे. कोर्ट कचेरीबद्दल मकर राशीच्या लोकांच्या पक्षात निर्णय लागेल. तसेच वडिलांकडून आर्थिक सहाय्य मिळेल.
अधिक वाचा : ज्योतिष: हळदीसह या तीन गोष्टी कोणालाही देऊ नका उधार, नाहीतर होणार नाही घराची प्रगती
तुळ राशीच्या लोकांना गोचर काळात नोकरीची नवी संधी चालू येईल. जे लोक सध्या नोकरी करत आहेत त्यांना बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबांत आनंद वाढेल. पैसे जमा करता येतील. आई वडिलांचे सहकार्य लाभेल. व्यापारात मोठा आर्थिक लाभ होईल.
(विशेष सूचना: सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही)