Astrology: २३ दिवसांपर्यंत या तीन राशींचे दिवस असणार वाईट, शुक्र गोचरचा होणार परिणाम

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 21, 2022 | 12:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

shukra gochar: शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करत आह. १३ जुलैपर्यंत तेथे विराजमान राहणार आहे. यानंतर मिथुन राशीत जाणार आहे. शुक्राच्या या गोचरमुळे काही राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर परिणाम होणार आहे. 

shukra
Astrology: २३ दिवसांपर्यंत या तीन राशींचे दिवस असणार वाईट 
थोडं पण कामाचं
  • नऊ ग्रहांपैकी एक ग्रह शुक्र ग्रह १८ जूनला राशी परिवर्तन करत वृषभ राशीत प्रवेश करत आहे
  • शुक्राचे गोचर झाल्याने काही राशींना शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत.
  • शुक्रचे राशी परिवर्तन झाल्याने तीन राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे.

मुंबई: ज्योतिष गणनेनुसार कुंडलीतील(kundli) प्रत्येक ग्रह आणि नक्षत्राचा शुभ अथवा अशुभ परिणाम होत असतो. याच पद्धतीने नऊ ग्रहांपैकी एक ग्रह शुक्र(shukra) ग्रह १८ जूनला राशी परिवर्तन करत वृषभ राशीत प्रवेश करत आहे. शुक्राचे गोचर झाल्याने काही राशींना शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत. तर राशींसाठी अशुभ ठरणार आहे. शुक्रचे राशी परिवर्तन झाल्याने तीन राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे. या राशींची आर्थिक स्थिती बिघडू शकते. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला अधिक मेहनत करावी लागू शकते. यासोबतच कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोणत्या राशींवर शुक्र गोचरचा परिणाम होणार आहे...shukra gochar will effect on this 3 zodiac sign

अधिक वाचा - एकनाथ शिंदेंच्या नाराजीची ही आहेत प्रमुख कारणे 

मिथुन रास

शुक्र गोचर मिथुन राशीमध्ये व्यय भावात होत आहे. येथे बुधदेव सुरूवातीपासूनच विराजमान आहेत. आर्थिक बाजू कमकुवत होऊ शकते. आरोग्यासंबंधीच्या तक्रारी वाढू शकतात. दूरचे प्रवास संभवतात. परदेशात इम्पोर्टसंबंधी व्यवसायात लाभ मिळू शकतात. दाम्पत्य जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते. 

तूळ रास

शुक्र तुमच्या राशीचा अधिपती होऊन अष्टम स्थानावर विराजमानहोणार आहे. यश मिळवण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागू शकतात. आर्थिक स्थिती बिकट होऊ शकते. कौटुंबिक जीवनात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. दाम्पत्य जीवनात समस्या येतील. आरोग्यासंबंधी त्रास वाढू शकतात. धार्मिक कार्यात भाग घ्याल. 

अधिक वाचा - योगाने कुंज यादव स्वत:ला फिट ठेवते

धनू रास

`क्राचे हे गोचर तुमच्या सहाव्या स्थानावर राहील. आर्थिक समस्या वाढू शकतात. आरोग्यासंबंधी त्रासाचा सामना करावा लागू शकतो. पैशांची देवाणघेवाण सावधानतेने करा. पैसा अडकून राहू शकतो. शत्रू पक्ष भारी पडू शकतो. नोकरीत स्थान परिवर्तन होऊ शकते. अनावश्यक खर्च वाढू शकतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी