Shukra Gochar 2022: २४ सप्टेंबरला शुक्र ग्रह होणार कन्या राशी गोचर, या तीन राशीच्या लोकांचे फळफळणार नशीब, होईल माता लक्ष्मीची कृपा

वैदिक शास्त्रानुसार शुक्र ग्रह हा प्रेम, जोडीदार, सकारात्मक विचार आणि सर्व भौतिक सुखांचे प्रतीक मानले गेले आहे. शुक्र ग्रह हा शुभ ग्रह मानला जातो. शुक्र ग्रहाचा प्रभावाने व्यक्तीमध्ये चांगले गुण निर्माण होतात. शुक्र ग्रह वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे. तर मीन ही उच्च आणि कन्या ही खालची रास आहे. त्याशिवाय शुक्र ग्रह कुठल्याही राशीत गोचर झाल्यास त्याचा व्यक्तीच्या जीवनावर फरक पडतो. यावेळी २४ सप्टेंबरला शुक्र राशी ही कन्या राशीत गोचर होणार आहे.

shukra gochar
शुक्र गोचर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वैदिक शास्त्रानुसार शुक्र ग्रह हा प्रेम, जोडीदार, सकारात्मक विचार आणि सर्व भौतिक सुखांचे प्रतीक मानले गेले आहे.
  • शुक्र ग्रह हा शुभ ग्रह मानला जातो. शुक्र ग्रहाचा प्रभावाने व्यक्तीमध्ये चांगले गुण निर्माण होतात.
  • यावेळी २४ सप्टेंबरला शुक्र राशी ही कन्या राशीत गोचर होणार आहे.

Shukra Gochar 2022:  वैदिक शास्त्रानुसार(vaidik shastra) शुक्र ग्रह (Venus Planet) हा प्रेम, जोडीदार, सकारात्मक विचार आणि सर्व भौतिक सुखांचे प्रतीक मानले गेले आहे. शुक्र ग्रह हा शुभ ग्रह मानला जातो. शुक्र ग्रहाचा प्रभावाने व्यक्तीमध्ये चांगले गुण निर्माण होतात. शुक्र ग्रह वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे. तर मीन ही उच्च आणि कन्या ही खालची रास आहे. त्याशिवाय शुक्र ग्रह कुठल्याही राशीत गोचर झाल्यास त्याचा व्यक्तीच्या जीवनावर फरक पडतो. यावेळी २४ सप्टेंबरला शुक्र राशी ही कन्या राशीत गोचर होणार आहे. रात्री ८ वाजून ५१ मिनिटांनी हा ग्रह गोचर होणार आहे. तर या गोचरमुळे तीन राशींचे भाग्य बदलणार आहे, जाणून घेऊया या तीन राशींबद्दल. (shuktra gochar in three zodiac sign will benefit read in marathi)

अधिक वाचा : Navratri 2022: अशी करा घटस्थापना! जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत

वृषभ

शुक्र ग्रह हा वृषभ राशीचा स्वामी आहे. शुक्र ग्रहाच्या कन्या राशीत गोचर झाल्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तीच्या घरातील सर्व समस्या दूर होती. वृषभ राशीच्या लोकांच्या कुटुंबीयातील संबंध सुधारतील तसेच कुटुंबाच्या सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. आर्थिक परिस्थिती सुधरेल तसेच नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. मान सन्मान वाढेल आणि विवाहित दाम्पत्यांना गोड बातमी मिएल. त्याशिवाय वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील.

अधिक वाचा : Navratri 2022: शारदीय नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका 'हे' काम, अवश्य पाळा नियम; नाहीतर नाराज दुर्गामाता

मिथून

बुध ग्रह हा मिथून राशीचा स्वामी आहे. शुक्र ग्रह हा बुध ग्रहाचा मित्र आहे. मिथून राशीच्या लोकांसाठी गोचरचा काळ चांगला आणि लाभदायी असणार आहे. या काळात मिथून राशीच्या लोकांना मालमता व्यवहारात मोठा फायदा होणार आहे. घर विकत घेणे शुभ असेल. आर्थिक संकट दूर होऊन आर्थिक प्रगती होईल. कौटुंबिक आयुष्यात सुख शांती लाभेल. समजात मान सन्मान वाढेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रवासाचा योग येईल. मोठा आजार बरा होईल.  

अधिक वाचा :  Pitru Paksh: पितृ पक्षात खाऊ नका कांदा- लसूण, मग अशी बनवा बटाटा-टोमॅटोची स्वादिष्ट भाजी; मराठीतून सोपी रेसिपी

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रह हा त्यांच्या दुसर्‍या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे. आता शुक्र ग्रह हा कन्या राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे येणारा काळ कन्या राशीसाठी चांगला असणार आहे. आर्थिक स्थिती भक्कम होणार आहे. तर अडलेल पैसे परत मिळणार आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे तर आयुष्यात सुरू असलेली समस्या दूर होणार आहे. आयुष्यात आनंद येणार आहे. कार्यक्षेत्रात प्रभाव वाढेल. व्यवसायातही वृद्धी होईल. धार्मिक कार्यात मन लागेल. परदेश यात्रेचा योग येईल.

अधिक वाचा :

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी