Som Pradosh Vrat 2022: उद्या आहे सोम प्रदोष व्रत, हे व्रत केल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात असे सांगितले जाते. प्रदोष व्रत त्रयोदशी तिथीच्या दिवशी केला जातो. सोमवारी हे व्रत असल्याने या उपवासाला सोम प्रदोष व्रत म्हटले जाते.
सोम प्रदोष व्रत हे भगवान शंकराला समर्पण करून केले जाते. २५ जुलै सोमवारी हे सोमप्रदोष आहे. हे व्रत केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि आयुष्यातील दुःख दूर होता. तसेच भगवान शंकर मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात.
अधिक वाचा : सूर्य गोचर २०२२, ३ राशींना फायदा, सूर्याचा शुभ प्रभाव
कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथी २५ जुलै २०२२ रोजी सांयकाळी ४.१५ वाजता सुरू होणार आणि २६ जुलै २०२२ रोजी सांयकाळी ६.०४ वाजता संपणार आहे. अशा वेळी सोमप्रदोष व्रत पुजा करण्याचा शुभ मुहुर्त २५ जुलैच्या सांयकाळी ७.१७ ते रात्री ९.२१ वाजेपर्यंत असणार आहे.
अधिक वाचा : Vastu Tips: तूप आणि तेलाच्या दिव्याचे आहेत वेगवेगळे नियम
सोम प्रदोषला उपवास करताना धान्य, साधे मीठ, तांदूळ खाण्यास मनाई असते. या दिवशी फळं खाणे योग्य. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे घालून उपवास सुरू करावा. सोम प्रदोष उपवास करताना सांयकाळी भगवान शंकराची पुजा केली जाते असे असले तरी सकाळी सकाळी भगवान शंकारचे दर्शन घ्यावे.
अधिक वाचा : money tips: महिना पूर्ण होण्याआधी रिकामा होतो तुमचा खिसा? करा हे ३ सोपे उपाय
(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)