नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र शाखेला तितकेच महत्त्व आहे. ज्या प्रमाणे आपली राशी, कुंडलीमधील ग्रह आणि नक्षत्रांचा आपल्या जीवनावर असतो तसाच आपल्या जन्म तारखेचाही प्रभाव आपल्या आयुष्यावर असतो. जन्म तारखेच्या अधारावरच मूलांक किंवा भाग्यांक काढला जातो. (spirtual numerology and horoscope of birth date )
अंकशास्त्रात १ ते ९ पर्यंत मूलांक सांगण्यात आले आहेत. राशीप्रमणे सर्व मुलांकांचा संबंध नवग्रहाशी असल्याचे म्हणतात. ज्या मुलांकांचा ग्रह आहे त्या मुलांकामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव पडतो असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. आज आपणे असे अंक पाहूया जे त्या व्यक्तींसाठी नशीबवान ठरतात.
ज्योतिष शास्त्रातील अंकशास्त्रात ९ अंक फार महत्त्वाचा समजला जातो . जर तुमचा जन्म ९, १८ किंवा २७ तारखेला झाला असेल तर तुमचा भाग्यांक किंवा मुलांक ९ आहे. मूलांक काढण्यासाठी आपल्या जन्म तारखेतील दोन आकड्यांची बेरीज करावी. समजा तुमचा जन्म २७ तारखेला झाला असेल तर २+७=९ असणार आहे. अशा प्रकारे आपला मुलांक काढता येतो.
अंकशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा मुलांक ९ असतो ते खूप हुशार असतात. आयुष्यात त्यांना जे जे हवं असतं ते मिळवण्यात ते यशस्वी ठरतात. हुशार आणि मेहनती असल्याने हे लोक आयुष्यात लवकर प्रगती करतात. मुलांक ९ असलेल्या व्यक्तींना आयुष्यात पैश्यांची कमतरता भासत नाही असे सांगितले जाते.
ज्यांचा मुलांक ९ असतो, ते खर्या अर्थाने श्रीमंत असतात. हे लोक आपल्या कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारांवार खूप पैसे खर्च करतात. याची राहणी उच्च असते. असे असले तरी ९ मुलांक असलेले व्यक्ती थोडे रागीट स्वभावाचे असतात. आपल्याबाबत कोण काय विचार करतो याबाबत त्यांना चिंता नसते. ९ मुलांक असलेल्या व्यक्तींच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढ उतार असतात असे सांगितले जाते.