मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार(astrology) सूर्याला(sun transist) एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यास ३० दिवसांचा कालावधी लागतो. प्रत्येक महिन्यात सूर्य राशी परिवर्तन करत असतो. १६ जुलैला पुन्हा एकदा सूर्य आपल्या राशी परिवर्तन करत कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि १७ ऑगस्टपर्यंत तिथेच विराजमान राहणार आहे. सूर्याचे हे राशी परिवर्तनाचा प्रभाव तसे तर १२ राशींवर होत असतोमात्र काही राशींवर याचा शुभ तर काही राशींवर याचा अशुभ परिणाम होत असतो. sun transist may good affect on this 3 zodiac sign
अधिक वाचा - आठवड्याच्या दिवसाप्रमाणे परिधान करा कपडे, होईल फायदा
ज्योतिषानुसार सूर्याचे राशी परिवर्तन ३ राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या व्यक्तींसाठी हे दिवस सोन्यापेक्षा कमी नाहीत. यांचे नशीब सूर्यासारखे चमकणार आहे. या राशीच्या व्यक्तींवर सूर्यय देव पूर्ण एक महिना मेहरबान असणार आहे. जाणून घेऊया हा महिना कोणासाठी लाभदायक ठरणार आहे.
मेष रास - ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य १६ जुलैला कर्क राशीत प्रवेश करत आहे. अशातच मेष राशींच्या व्यक्तींसाठी हे गोचर शुभ ठरणार आहे. नोकरीपेशा व्यक्तींना या कालावधीत पदोन्नतीच्या ऑफर मिळू शकतात तसेच इन्क्रिमेंट मिळण्याची शक्यता आहे. प्रमोशन होऊ शकते. इतकेच नव्हे तर नव्या जॉबची ऑफर मिळू शकते. बिझनेसमध्ये मोठे डील फायनल करू शकता आणि यातून लाभ मिळू शकतो.
वृषभ रास - वृषभ राशीच्या व्यक्तींना हा काळ शुभ असणार आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असाल तर सूर्य गोचरदरम्यान चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. तर नोकरी करणाऱ्या लोकांना या कालावधीत नवी नोकरी मिळण्याची संधी मिळू शकते. व्यापाराशी संबंधित प्रवासाचे योग बनत आहेत.
अधिक वाचा - युरिक ॲसिड कमी कऱण्याचा ‘मसालेदार’ उपाय
मिथुन रास - ज्योतिषानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींचेही नशीब सूर्याप्रमाणे चमकणार आहे. सूर्याचे राशी परिवर्तन या राशीच्या लोकांसाठी शुभ वेळ घेऊन येणार आहे. या दरम्यान व्यक्तींना मोठे लाभ होणार आहेत. नोकरीपेशा लोकांना या कालावधीत प्रमोशन अथवा पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. धनलाभ होईल. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणूक लाभदायक ठरू शकते.