Surya Gochar 2022: 17 ऑक्टोबरपासून या 5 राशींना होणार धनलाभ आणि चमकणार नशीब, सुर्य गोचरचा होणार लाभ

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसर ग्रहांच्या स्थिती परिवर्तनामुळे 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडतो. दर महिन्याला बहुतांश ग्रहांचे राशी परिवर्तन होते. अशा वेळी सुर्य कुठल्याना कुठल्या तरी राशी प्रवेश करतो. आता 17 ऑक्टोबर रोजी सुर्य ग्रह कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सुर्य गोचरमुळे प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यावर चांगला वाईट प्रभाव पडतो.

sunt transit
सुर्य गोचर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वैदिक ज्योतिष शास्त्रानुसर ग्रहांच्या स्थिती परिवर्तनामुळे 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडतो.
  • दर महिन्याला बहुतांश ग्रहांचे राशी परिवर्तन होते.
  • अशा वेळी सुर्य कुठल्याना कुठल्या तरी राशी प्रवेश करतो.

Surya Gochar 2022:  वैदिक ज्योतिष शास्त्रानुसर ग्रहांच्या स्थिती परिवर्तनामुळे 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडतो. दर महिन्याला बहुतांश ग्रहांचे राशी परिवर्तन होते. अशा वेळी सुर्य कुठल्याना कुठल्या तरी राशी प्रवेश करतो. आता 17 ऑक्टोबर रोजी सुर्य ग्रह कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सुर्य गोचरमुळे प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यावर चांगला वाईट प्रभाव पडतो. आता सुर्य गोचरमुळे पाच राशींचे भाग्य बदलणार आहे. जाणू घेऊया सुर्य गोचरमुळे कुणाचे भाग्य बदलणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 17 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 7 वाजून 36 मिनिटांनी तूळ राशी प्रवेश करणार आहे. त्यानंतर 17 नोव्हेंबरला सांयकाळी सुर्य ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. (sun transit in libra zodiac sign these zodian sign will benefits in gochar period)

अधिक वाचा : Dream Interpretation:नवरात्रीमध्ये स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर माता दुर्गाची होईल कृपा, मिळेल भरभराटीचे यश

सुर्य गोचर मुळे या राशींचे उजळणार भाग्य 

वृषभ राशी

सुर्य गोचरमुळे वृषभ राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना व्यापार आणि उद्योगात फायदा होणार आहे. जे लोक नोकरी शोधत होते त्यांना रोजगार मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तसेच अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत.

सिंह राशी

सुर्य ग्रह तूळ राशी प्रवेश करणार आहे, त्यामुळे सिंह राशींच्या लोकांच्या आयुष्यात लाभ होणार आहेत. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद होणार आहेत. नोकरीत बढती मिळणार आहेत तसेच आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. 

धनु राशी

सुर्य गोचरमुळे धनू राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांची गोचर काळात समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे, करीअरमध्ये यश लाभणार आहे. तसेच उद्योगात मोठा नफा होणार आहे. 

अधिक वाचा : Astro Tips: 'या' 4 राशींचे बदलणार नशीब, शनी-बुधच्या हालचालीमुळे होणार मोठा फायदा

मकर राशी

सुर्य गोचरमुळे मकर राशीच्या लोकांनाही लाभ होणार आहे. मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा होणाअर आहे, त्यामुळे येत्या काळात बढती होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे तर रखडलेली कामे पूर्ण होतील. गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ आहे, त्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

मीन राशी

मीन राशीच्या लोकांनाही सुर्य गोचरमुळे मोठा फायदा होणार आहे. मीन राशीच्या लोकांची ठरवलेली कामे पूर्ण होतील, अचानक धनलाभ होईल. गुंतवणुक करण्यासाठी उत्तम वेळ आहे. 

अधिक वाचा :Vastu Shastra: जेवल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' काम; लक्ष्मी होईल नाराज; बसेल मोठा फटका

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी