Shri Surya Dev Puja Aarti in Marathi , मुंबई : अखंड पृथ्वीचे पालनहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच, आपल्या तेजाच्या प्रकाशाने संपूर्ण पृथ्वीला प्रकाशमान करणारे जगत्महरणा सूर्यदेव यांच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तसचं, त्यांची आराधना करण्यासाठी पठन करण्यात येत असलेल्या तीन आरत्या आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत.
भारतीय संस्कृतीमध्ये सर्व देव-देवतांची उपासना केली जाते. त्यापैकी एक असलेल्या सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'रथ सप्तमी' (Ratha Saptami) हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते. माघ मासातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात. म्हणून 'रथ सप्तमी' असा शब्द वापरला जातो.
अधिक वाचा : मासिक पाळीच्या अनियमिततेवर आयुर्वेदिक उपचार
उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा ॥
पद्मासन सुखमुर्ती सुहास्यवरवदना ।
पद्मकरा वरदप्रभ भास्वत सुखसदना ॥ १ ॥
जय देव जय देव जय भास्कर सूर्या ।
विधिहरिशंकररूपा जय सुरवरवर्या ॥ ध्रु० ॥
कनकाकृतिरथ एकचक्रांकित तरणी ।
सप्ताननाश्वभूषित रथि ता बैसोनी ॥
योजनसह्स्त्र द्वे द्वे शतयोजन दोनी ।
निमिषार्धे जग क्रमिसी अद्भुत तव करणी ॥ जय० ॥ २ ॥
जगदुद्भवस्थितिप्रलय-करणाद्यरूपा ।
ब्रह्म परात्पर पूर्ण तूम अद्वय तद्रूपा ॥
तत्त्वपदव्यतिरिक्ता अखंड सुखरूपा ।
अनन्य तव पद मौनी वंदित चिद्र्पा ॥ जय० ॥ ३ ॥
अधिक वाचा : वजन कमी करण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय
जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या ।
एकारति ओवाळु सुरगण - प्रभुवर्या ॥धृ॥
द्वादश नामें करुनि करितां तव प्रणती ।
दोष निवारुनि इच्छित मनोरथ पुरती ।
अर्ध्यप्रदान करितां पुण्याची प्राप्ती ।
दर्शनमात्रें साधक भवसागर तरती ॥१॥
ब्राह्मणकुळासि दैवत तुजवांचुनि नाहीं ।
त्रिकाळ अर्घ्य देती द्विजवर लवलाहीं ॥
प्रथम अहूति अर्पण यज्ञाचे ठायीं ।
सर्व जगाचि दृष्टी तुजयोगें पाहीं ॥२॥
दशयोजन मोठा रथ निजसारथि अरुण ॥
सप्तमुखाचा अश्व शोभतसे वहन ।
अठ्यायशीसहस्त्र ऋषि करिति स्तवन ।
निरंजन प्रार्थितसे करुनिया नमन ॥३॥
अधिक वाचा : गुलाबी थंडीत दुधासोबत गरमागरम जिलेबीखाल्ल्यास चवच नाही तर आरोग्यही सुधारेल!
जयदेव जयदेव जय भास्कर सूर्या विधिहरि शंकररूपा जय सुरवरवर्या ||धृ ||
जय जय जगतमहरणा दिनकर सुखकिरणा | उड्याचल भासक दिनमणी शुभस्मरणा |
पद्मासन सूर्यमूर्ती सुहास्य वरवंदना | पद्माकर वरदप्रभ भास्तव सुखसदना ||१||
कनका कृतिरथ एक चक्राकित तरणी | सप्तानना श्र्वभूषित रथीं त्या बैसोनि |
योजनासहस्त्र द्वे द्वे शतयोजन दोनीं | निमिषार्धे जग क्रमीसी अद्भुत तव करणी ||२||
जगदुद्व स्थिती प्रलयकरणाद्यरूपा | ब्रम्ह परात्पर पूर्ण तूं अद्वं तद्रूपा |
ततवंपदव्यतिरिक्ता अखंडसुखरूपा | अनन्य तव पद मौनी वंदित चिद्रूपा || ३ || जयदेव ..