२१ जून रोजी सर्वात मोठे सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ आणि कुठे दिसणार

Solar Eclipse June 2020: २१ जून २०२० रोजी म्हणजेच रविवारी सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण भारतातील काही भागांतून पहायला मिळणार आहे. जाणून घ्या सूर्यग्रहणाची वेळ आणि इतर माहिती.

Surya Grahan 2020
सूर्यग्रहण 

थोडं पण कामाचं

  • २१ जून म्हणजेच रविवारी शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण 
  • हे सूर्यग्रहण भारतासह इतर देशांतील काही भागांत पाहता येणार 
  • २१ जून रोजीचं सूर्यग्रहण हे प्रथम आफ्रिकेतील कांगो येथून सुरू होणार 

नवी दिल्ली: या रविवारी म्हणजेच २१ जून २०२० (21st June 2020) रोजी शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण (Solar Eclipse) होणार आहे. असं म्हटलं जात आहे की हे सूर्यग्रहण देशातील बऱ्याच भागात कंकणाकृती स्थितीत दिसेल. कंकणाकृती स्थितीत चंद्र हा सूर्याच्या समोर येतो आणि त्यामुळे सूर्याचा काही भाग झाकला जातो. या परिस्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात तर काहीजण रिंग ऑफ फायर असंही संबोधतात.

आफ्रिकेतून सुरूवात 

२१ जून रोजीचं सूर्यग्रहण हे आफ्रिकेतील कांगो येथून सुरू होणार आहे आणि त्यानंतर इथिओपिया, येमेन, ओमान, सौदी अरेबिया, हिंद महासागर, पाकिस्तान नंतर भारतातील राजस्थानमध्ये प्रवेश करेल. भारतानंतर तिबेट, चीन, तैवानच्या दिशेने प्रशांत महासागराच्या मध्यभागी सूर्यग्रहण समाप्त होईल.  

ग्रहण किती वाजता? 

२१ जून रोजी रविवारी सकाळी १०.१७ मिनिटांनी ग्रहणाला सुरूवात होईल. तर, दुपारी १२ वाजून १० मिनिटांपर्यंत सूर्यग्रहणाचा मध्यकाळ असेल आणि दुपारी २ वाजून २ मिनिटांनी सूर्यग्रहण समाप्त होईल. २१ जून २०२० रोजीचं सूर्यग्रहण झाल्यानंतर २०२० या वर्षाच्या शेवटी आणखी एक सूर्यग्रहण होणार आहे. यावेळी सूर्यग्रहण हे भारतातूनही पहायला मिळणार आहे मात्र, ग्रहण पाहताना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा ते तुमच्या डोळ्यांना दुखापत करु शकतं. 

कुठे दिसणार ग्रहण 

हे सूर्यग्रहण भारतातील काही भागांत दिसणार आहे. यासोबतच आशिया, आफ्रिका, हिंद महासागर, युरोपमधील काही भागांत आणि ऑस्ट्रेलियातही पहायला मिळणार आहे.

हे ग्रहण १९९५ची आठवण करुन देणार 

२१ जून रोजीचं सूर्यग्रहण २५ वर्षांपूर्वी झालेल्या २४ ऑक्टोबर १९९५ रोजीच्या ग्रहणाची आठवण करुन देईल. त्या दिवशी झालेल्या सूर्यग्रहणाने अनेक भागांत काहीसा अंधार झाला होता. त्याच प्रमाणे यावेळी सुद्धा अंधार होण्याची शक्यता आहे.

सूर्यग्रहण पाहताना काळजी 

सूर्यग्रहण पाहताना आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे. नुसत्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिल्यास त्यामुळे डोळ्यांना अपायकारक ठरु शकतं. सूर्यग्रहण पाहण्यासाठी दुर्बिण, टेलिस्कोप, ऑप्टिकल कॅमेराच्या सहाय्याने पाहता येऊ शकतं.

१४ डिसेंबर रोजी वर्षातील शेवटं सूर्यग्रहण 

२०२० या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण हे १४ डिसेंबर रोजी होणार आहे. या ग्रहण काळात चंद्र हा सूर्याला पूर्णपणे झाकेल आणि पृथ्वीवर त्याची सावली पहायला मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी