Surya Grahan 2023: या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी, 'या' तीन राशीच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार

Surya Grahan 2023 : या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे. वर्षातील पहिलं हे सूर्यग्रहण ज्योतिषीय दृष्टीने फार महत्त्वपूर्ण असणार आहे. जाणून घ्या सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींना विशेष लाभ होणार आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • 2020 या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी
 • खग्रास सूर्यग्रहण हे भारतातून दिसणार नाही

Solar Eclipse 2023: वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणावेळी सूर्य मेष राशीत असणार आहे. मेष राशीचे स्वामी मंगळ ग्रह आहे ज्यांना ग्रहांचे सेनापती असेही म्हटले जाते. अशा स्थितीत सूर्यग्रहणाचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यावर होणार आहे.

2023 या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे खग्रास सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये. मात्र, राशींनुसार, हे सूर्यग्रहण काही व्यक्तींच्या आयुष्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव टाकू शकतं. जाणून घ्या सूर्यग्रहणामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

हे पण वाचा : सकाळी रिकाम्या पोटी काळा चहा पिण्याचे 5 जबरदस्त फायदे

2023 या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कधी?

या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी आहे. सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी हे सूर्यग्रहण सुरू होणार आहे. जे दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी समाप्त होणार आहे.

हे पण वाचा : अरे बापरे! तुमची ढेकर या गंभीर आजाराचे असू शकते लक्षण

सूर्यग्रहणाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ होणार

 1. वृषभ / Tauras
  या राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहणामुळे विशेष लाभ होणार आहे. सूर्य हा मेष राशीत असल्याने शारीरिक, मानसिक आणि आर्थिक लाभ मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील. याच्यासोबतच कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल.
 2. मिथुन / Gemini
  मिथुन राशीच्या व्यक्तींना सुद्धा वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणामुळे लाभ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे आणि त्यासोबतच रखडलेली कामे सुरू होतील. याच्यासोबतच व्यापारात तुम्हाला चांगला लाभ मिळण्याचे संकेत आहेत. तसेच व्यापारात गुंतवणूक केल्याने लाभ मिळेल.
 3. धनु / Sagittarius
  धनु राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहणामुळे चांगला लाभ होईल. आनंदवार्ता मिळेल. नोकरी आणि व्यापारात लाभ मिळेल. करिअरमध्ये नव्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी