Surya Grahan 2023 : वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण, 'या' राशीच्या व्यक्तींनी व्हा सावध

Solar Eclipse surya grahan 2023: ग्रहणाच्या संदर्भात अनेक मान्यता आहेत कारण ग्रहणाचा प्रभाव हा सर्व राशींवर पडतो. 2023 या वर्षात सूर्यग्रहण कधी आहे आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींनी सावध रहायला हवं? वाचा...

Surya Grahan 2023 solar eclipse these zodiac person should alert read grahan day date time in marathi
Surya Grahan 2023 : वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण, 'या' राशीच्या व्यक्तींनी व्हा सावध  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • 2023 या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण
  • जाणून घ्या सूर्यग्रहणाची वेळ आणि इतर माहिती

Surya Grahan 2023 date time : ज्योतिष शास्त्रात सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहे की, ग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे आणि याचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. 2023 या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण गुरुवार, 20 एप्रिल रोजी आहे. या सूर्यग्रहणाचा कालावधी सकाळी 7 वाजून 4 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत आहे. ज्योतिष विज्ञानानुसार, या ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर पडतो. मात्र, मेष राशींसह तीन राशीच्या व्यक्तींनी या काळात खूप अलर्ट राहण्याची गरज आहे.

Surya Grahan Date and Time: सूर्य ग्रहण कधी 

  1. दिनांक - 20 एप्रिल 2023
  2. वार - गुरुवार
  3. ग्रहणाचा काळ - सकाळी 7.04 वाजल्यापासून ते दुपारी 12.29 मिनिटांपर्यंत

हे पण वाचा : हा किडा चावताच मांसाहारी लोक होतील शाकाहारी

Grahan may affect these zodiac sign

कन्या राशी - सूर्यग्रहणामुळे कन्या राशीच्या व्यक्तींनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. या काळात नकारात्मक विचार मनात येऊ शकतात. तसेच वाईट स्वप्न सुद्धा पडू शकतात. मानसिक तणाव येण्याची शक्यता आहे. अपयशाचा सामना सुद्धा करावा लागण्याची शक्यता आहे. या काळात रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात.

हे पण वाचा : सुतारकाम करणारी बिकिनी बेब पाहून व्हाल घायाळ

सिंह राशी - एप्रिल महिन्यात सूर्यग्रहणाचा सिंह राशीच्या व्यक्तींवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. या काळात करण्यात आलेल्या कार्यांचा उलट परिणाम होऊ शखतो. शैक्षणिक क्षेत्रात अडचणी येऊ शकतात. तुम्ही कार्य करत असलेल्या क्षेत्रात सावध राहण्याची आवश्यकता आहे, कारण विविध समस्या उत्पन्न होऊ शकतात. मानसिक समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.

हे पण वाचा : या दाम्पत्याने हनीमूनचा व्हिडिओच इंटरनेटवर पोस्ट केला अन्....

मेष राशी - या राशीच्या व्यक्तींनी सूर्यग्रहणामुळे सावध राहण्याची आवश्यकता आहे कारण त्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात सूर्य देव याच राशीत विराजमान होणार आहेत त्यामुळे ग्रहणाचा वाईट प्रभाव अधिक दिसून येऊ शकतो. एखादे काम पूर्ण होण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू सकतो. 

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी