श्रावण: तामिळनाडूच्या या मंदिरात होतो चमत्कार, शिवलिंगावर दूध चढवताच होतो निळा रंग

धर्म-कर्म-भविष्य
Updated Aug 12, 2019 | 22:14 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

नागनाथस्वामींचे मंदिर अनेक प्रकाराने खास आहे. राहू, केतू आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या मंदिरात विशेष पद्धतीने पुजा केली जाते.

lord shiva
शंकर भगवान 

थोडं पण कामाचं

  • भारतात असेही मंदिर आहे जिथे शिवलिंगावर दूध चढवल्यास ते निळे होते
  • या अनोख्या मंदिरात ग्रह शांती तसेच कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते.
  • या मंदिरात विशेष पद्धतीने पुजा केली जाते

मुंबई: साधारणपणे हिंदू धर्मात सर्व देवांमध्ये भगवान शंकराला श्रेष्ठ देव मानले जाते. जगभरात असंख्या शिवभक्त आहे आणि प्रत्येक मंदिरात शंकराची पुजा ही नित्यनियमाने आणि भावभक्तीने केली जाते. चांगल्या जोडीदारासोबत आणखी अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी शंकराची आराधना करतात. भारतात असे एक शिव मंदिर आहे जेथील शिवलिंगावर दूध चढवल्यास ते निळे होते. या अनोख्या मंदिरात लोक ग्रह शांती तसेच कालसर्प दोषापासूम मुक्ती मिळवण्यासाठी विशेष पुजा केली जाते. 

कालसर्प दोष दूर करण्यासाठी येतात लोक

ग्रह शआंती तसेच छाया ग्रह केतु पुजा करण्यासाठी या शिवमंदिराचे नाव नागनाथस्वामी आहे. ज्योतिषावर विश्वास ठेवणारे येथे येऊन इथे विशेष पुजा करतात. यामुळे ग्रहदोष दूर होण्यास मदत होते. कुंडलीमधील कालसर्प दोष दूर करण्यासाठीही या मंदिरात पुजा केली जाते. 

Rudrabhishek vidhi

येथे आहे हे मंदिर

नागनाथस्वामी मंदिर तामिळनाडू राज्यातील कीझापेरुपल्लमच्या कावेरी नदीच्या डेल्टायेथे स्थित आहे. हे ठिकाण पुमपुहारपासून साधारण दोन किमी दूर आहे. हे अद्भुत मंदिर प्राचीन काळआपासून छाया ग्रह केतुला समर्पित आहे. कालसर्प दोष तसेच केतु ची पुजा सह येथे राहु ग्रह शांतीसाठी विशेष पुजा केली जाते. 

निळ्या रंगाचे होते शिवलिंग

नागनाथस्वामी बऱ्याच अर्थाने खास आहे. राहु, केतु आणि कालसर्प दोषापासूम मुक्ती मिळवण्यासाठी या मंदिरात शिवाची विशेष प्रकाराने पुजा केली जाते. या दरम्यान रुद्राभिषेकही केला जातो. शिवलिंगावर दूध अर्पण केले जाते. शिवलिंगावर दूध पडताच ते निळे होते. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. 

Happy Sawan shivratri Images and Wishes

शंकराचा चमत्कार मानला जातो

मानले जाते की प्राचीन काळात शेनबाका झाडांच्या खाली शिवलिंग सापडले होते. या दरम्यान शिव मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. याच कारणामुळे येथील मंदिरातील देवता शेन बगरन नावाने ओळखले जाते. येथे शिवलिंगावर दूध पडताच ते निळे झाल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
श्रावण: तामिळनाडूच्या या मंदिरात होतो चमत्कार, शिवलिंगावर दूध चढवताच होतो निळा रंग Description: नागनाथस्वामींचे मंदिर अनेक प्रकाराने खास आहे. राहू, केतू आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या मंदिरात विशेष पद्धतीने पुजा केली जाते.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...